व्याख्यानमाला

स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ 10, 11, 12 फेब्रुवारीला होणार व्याख्यान : अभिनेते व्याख्याते शरद पोंक्षे यांची लाभणार वैचारिक मेजवानी

Blog Image
एकूण दृश्ये: 166

स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ 10, 11, 12 फेब्रुवारीला होणार व्याख्यान : अभिनेते व्याख्याते शरद पोंक्षे यांची लाभणार वैचारिक मेजवानी 

    संगमनेर

मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यू स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सोमवार, दि. 10 ते बुधवार दि. 12 फेब्रुवारी या तीन दिवसा मंथन व्याख्यानमाला होणार आहे. राजस्थान युवक मंडळाने या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. सोमवारी 10 ला वंदे मातरम् से जन गण मन, मंगळवार 11 ला अजेय योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे तर बुधवार, 12 फेब्रुवारीला भारत काल, आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान होणार आहे. सुप्रसिद्ध नाट्य-चित्रपट अभिनेते व्याख्याते शरद पोंक्षे यांची वैचारिक मेजवानी लाभणार आहे. मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड, संगमनेर येथे तीन दिवस सायंकाळी 7 ते 8.30 या वेळेत होणार असून सदर व्याख्यान सर्वांसाठी विनामूल्य आहे. ही व्याख्यानमाला नव्या पिढीच्या विचारांना चालना, दिशा देणारी आणि प्रेरणा देणारी ठरेल. कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून रसिक श्रोत्यांनी वेळेच्या अगोदर येऊन स्थानापन्न व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपत्तीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे.

शिवाजी महाराज
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin