ब्रेकिंग न्यूज :
भारत

आता थांबायचे नाही, चालत राहायचे; न्याय हक्कासाठी लढत राहायचे ; कामगार, आदिवासी कष्टकरी शेतकऱ्यांचा एल्गार :  राजूरवरून निघालेला पायी लॉन्ग मार्च काही तासात संगमनेरमध्ये धडकणार

Blog Image
एकूण दृश्ये: 39

आता थांबायचे नाही, चालत राहायचे; न्याय हक्कासाठी लढत राहायचे ; कामगार, आदिवासी कष्टकरी शेतकऱ्यांचा एल्गार :  राजूरवरून निघालेला पायी लॉन्ग मार्च काही तासात संगमनेरमध्ये धडकणार ; आज  चार वाजता होणार मंत्रालयात बैठक 

     संगमनेर (प्रतिनिधी )  

किसान सभा, सीआयटीच्या नेतृत्वाखाली राजूर येथून  अहिल्नयागरच्या दिशेने निघालेला कामगार, आदिवासी शेतकऱ्यांचा दीडशे किलोमीटरचा लाँग मार्च आता अधिक तीव्र होत असून “आता थांबायचे नाही, चालतच राहायचे; न्याय हक्कासाठी लढत राहायचे” असा निर्धार करत काही अवघ्या काही तासात संगमनेर प्रांत कार्यालयावर धडकणार आहे.

या लढ्यात कामगार, शेतकरी, शालेय पोषण आहार कर्मचारी, आदिवासी बांधव, अर्धवेळ परिचारिका तसेच बांधकाम कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. हजारोंच्या संख्येने शेतकरी व आदिवासी बांधवांनी एकजूट दाखवत हा मोर्चा राजूरहून मार्गक्रमण करत बुधवार दि २५ ला प्रांत कार्यालयावर धडक देईल. आंदोलकांनी आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चा अनेकताच सरकार ला जाग आल्याचे दिसत असून कामगार नेते आता आज दुपारी चार वाजता मंत्रालयात या मागण्याच्या संदर्भात बैठक होणार असल्याचे कामगार नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले. बैठकीनंतर आंदोलनाची नेमकी दिशा काय असेल हेही निश्चित समजणार आहे परंतु निघालेला मोर्चा काल अकोले तहसील कार्यालय येथे थांबून संगमनेरच्या दिशेने या मोर्चाने कुछ केले आहे हा लॉन्ग मार्च धांदर फळाच्या पुढे आला असून काही तासातच संगमनेर प्रांत कार्यालयावर धडकणार आहे.

बैठकीनंतर या मोर्चाची दिशा निश्चित होईल.

याबाबत कामगार नेते डॉक्टर अजित नवले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आज चार वाजता मंत्रालयात याबाबत बैठक होणार असून बैठकीमध्ये काय निर्णय होईल असे ते म्हणाले. अन्यथा हा मोर्चा अहिल्यानगरकडे प्रस्थान करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मार्गातील प्रत्येक गावात कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात घोषणा देत शासनाला निवेदनही देण्यात आले होते. मात्र, शासनाने अद्याप कोणतीही ठोस दखल न घेतल्याने आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी हा लाँग मार्च अधिकच तापलेला दिसून येत आहे. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या "माझ्या जिवाची होतिया काहिली" या रचनेवर महिला पुरुष कामगार गाण्याच्या ठेक्यावर प्रत्येक पाऊल पुढे टाकत आहेत. जो पर्यंत न्याय मिळणार नाही त्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त करत हा एल्गार अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

----- Advertisements -----

लाँग मार्च : न्यायाच्या प्रतीक्षेत कर्मचाऱ्यांची अविरत पायपीट ; महिन्याला केवळ २५०० रुपयांवर संसाराचा गाडा ओढत दिवसभर राबणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी न्यायाच्या आशेने लाँग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी तब्बल १५४ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. संपूर्ण जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरून मिठ मिरची सोबत घेत हे कर्मचारी दाखल होणार आहे. कष्टकऱ्यांच्या माथी व्यवस्थेने लादलेला हा संघर्ष किती भीषण आहे, याचे हे जिवंत उदाहरण ठरत आहे. अत्यल्प मानधनात महिनाभर मेहनत करणाऱ्या या आहार कर्मचाऱ्यांनी न्याय व हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्यात सहभागी होत आपल्या व्यथा मांडण्यासाठी पायपीट केली आहे. शासनाने आपल्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, या अपेक्षेने ते लाँग मार्चमध्ये सामील झाले असून आता थांबायचे नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

 

स्वप्न पाहा आणि ते साकार करण्यासाठी मेहनत करा.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम