ब्रेकिंग न्यूज :
भारत

प्रतिबंधित मांगुर माशांचा ट्रक जप्त, २९ लाखांचा मुद्देमाल शिर्डी पोलिसांच्या ताब्यात ; चारही आरोपी पश्चिम बंगाल येथील

Blog Image
एकूण दृश्ये: 176

प्रतिबंधित मांगुर माशांचा ट्रक जप्त, २९ लाखांचा मुद्देमाल शिर्डी पोलिसांच्या ताब्यात ; चारही आरोपी पश्चिम बंगाल येथील

    शिर्डी ( प्रतिनिधी )

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा घाव घातला आहे. शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या सापळ्यात तब्बल ४०० किलो प्रतिबंधित मांगुर मासे वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला असून २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध माशांच्या तस्करीचा मोठा भांडाफोड झाला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पो. उप.निरीक्षक सागर काळे यांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. पोलिसांनी संशयित ट्रक अडवून तपासणी केली असता ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित मांगुर मासे असल्याचे उघड झाले. यावेळी ट्रकमधील चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी आपली नावे स्वपन नियम डे (३६), मकबुल रौफ सरदार (३१), कुतुब आयुब मंडल ( ३५) आणि मृत्युंजय मुकुल विश्वास (२७) अशी सांगितली. हे सर्वजण पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत. प्राथमिक चौकशीत आरोपींनी सांगितले की, पश्चिम बंगालमधून मिराज नावाच्या व्यक्तीने हे मासे भरून दिले होते आणि ते खोपोली, मुंबई येथे भाई नावाच्या व्यक्तीकडे पोहोचवण्याचे काम दिले होते. यानंतर ट्रक शिर्डी पोलीस ठाण्यात आणून मत्स्य व्यवसाय विभागाशी संपर्क साधण्यात आला. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी प्रतिक्षा सुधाकर पाटेकर यांनी तपासणी करून ट्रकमधील मासे प्रतिबंधित मांगुर असल्याची खात्री दिली.

----- Advertisements -----

पोलिसांनी आरोपींकडून ४ लाख रुपये किमतीचे ४०० किलो प्रतिबंधित मांगुर मासे तसेच २५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेले मासे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आले.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप.निरीक्षक दीपक मेढे व त्यांच्या पथकाने शिर्डी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे कारवाईची योजना आखली. दरम्यान, ट्रक क्रमांक डब्लू बी 25 एम 5023 मधून केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले मांगुर मासे नगर मनमाड महामार्गावरील निमगाव बायपास चौकातून जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पो. उप.निरीक्षक सागर काळे यांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. पोलिसांनी संशयित ट्रक अडवून तपासणी केली असता ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित मांगुर मासे असल्याचे उघड झाले

या प्रकरणी मत्स्य व्यवसाय विभागाच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २७५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदर कार्यवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin