ब्रेकिंग न्यूज :
भारत

आता तर हद्दच झाली ! संगमनेरातले तेलही गेले ; सीसीटीव्ही कॅमेरा हार्डडिस्क सबूतसह साडेचार लाख रुपयांचा माल चोरट्यांनी केला गायब ; चोरीचा उसळतोय आगडोंब ; नागरिक मारतायेत बोंब ; वाढत्या गुन्हेगारी पुढे पोलीस प्रशासन हतबल ! कुणास ठाऊक कधी वाढेल पोलीस बल ?

Blog Image
एकूण दृश्ये: 152

आता तर हद्दच झाली ! संगमनेरातले तेलही गेले ; सीसीटीव्ही कॅमेरा हार्डडिस्क सबूतसह साडेचार लाख रुपयांचा माल चोरट्यांनी केला गायब; ;चोरीचा उसळतोय आगडोंब ; नागरिक मारतायेत बोंब ; वाढत्या गुन्हेगारी पुढे पोलीस प्रशासन हतबल !  कुणास ठाऊक कधी वाढेल पोलीस बल ?

      संगमनेर ( प्रतिनिधी )

गेली काही महिन्यापासून संगमनेर शहरात चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला असून दिवसा ढवळ्या घरे फोडून ,सोने, पैसा लंपास केल्या जात आहे. त्यातच गांजा विक्रीचे मोठे रॉकेटसह दिवसा ढवळ्या लक्ष्मी नगरात घरफोडी, छोट्या मोठ्या चोऱ्यातून सोन्याच्या दागिन्यावर डल्ला दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

आता  तर संगमनेर शहरातील एका व्यापाऱ्याचे तब्बल साडेचार लाख रूपये किमतीचे तेलही चोरट्याने पळवले. एवढ्यावरच चोरट्याने आपले समाधान न मानता आपण पकडले जाणार नाही, या सुपीक कल्पनेने या अज्ञात चोरट्याने सीसीटीव्ही, कॅमेरा, हार्डडिस्कसह सबुतही चोरट्याने पास केले. होळीत ही कुप्रवृत्ती जाळण्याऐवजी चोरीचा भडका चांगलाच वाढत चालल्याने संगमनेर शहरात महिला, नागरिक आणि व्यापारीवर्ग या चोरट्यांच्या दहशतीखाली वावरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या घटनेमुळे असुरक्षिततेची भावना जनसामान्यात निर्माण झाल्याचेही दिसून येत आहे. संगमनेर अकोले रोडवर मुकेश रमणलाल कोठारी  वय ५२ यांचे अरिहंत ऑइल डेपो दुकान आणि गोडाऊन फोडून चोरट्याने तब्बल दीडशे खाद्य तेलाचे डबे असा एकूण साडेचार लाख रुपयाचा माल लंपास केल्याची घटना होळीच्या दिवशी सोमवार दि २ मार्च रात्री साडेसात ते सकाळी पाचच्या दरम्यान घडली. दिवसेंदिवस चोरीचा या भडक्यात वाढ होत असून नागरिक कायदा सुव्यवस्थे बाबत बोंब मारताना तर संतापजनक भावना व्यक्त करताना दिसून येतात. पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून अहोरात्र या घटनेचा माग घेत आहेत.

----- Advertisements -----

चोरीचे प्रमाण आणि त्या तुलनेत पोलिसांचे प्रमाण कमकुवत ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलीस बंदोबस्त आणि पोलीस बलात वाढ करण्यासाठी मागणी वारंवार होवूनही वरिष्ठाकडून याकडे फक्त लक्ष देऊ असे आश्वासन देत अद्याप पर्यंत पूर्ण केले गेले नाही. किंबहुना यावर ॲक्शन का होत नाही. संगमनेरमध्ये शहर, घारगाव, आश्वी आणि तालुका पोलीस ठाणे असूनही गुन्ह्याच्या आणि लोकसंख्येच्या तुलनेत या ठिकाणची गुन्हेगारी जगत, त्याचे जाळे, मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसून येते.

कोठारी यांच्या गोडाऊन मधून 120 पाम तेलाचे डबे, 30 सूर्यफूल खाद्यतेलाचे डबे अज्ञाताने पिकप मधून लंपास केले. त्याच्या विरोधात शहर पोलिसात भारतीय न्याय संहिता 305, 331 ,(4) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर घटनास्थळी शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी भेट दिली असून , यावेळी फोरेंसिक तज्ज्ञांना तपासणीसाठी पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास शहर पोलीस संतोष पगारे करीत आहेत .

स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.

संत एकनाथ
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin