ब्रेकिंग न्यूज :
भारत

२५ हजारा गांजा तस्करी ; पोलिसांनी दोघांना पकडले; मध्यरात्री पर्यंत सुरू होती कार्यवाही

Blog Image
एकूण दृश्ये: 233

२५ हजारा गांजा तस्करी ; दोघांना पकडले; शहर पोलीसांची मध्यरात्री पर्यंत सुरू होती कार्यवाही

   संगमनेर (प्रतिनिधी)

मागील आठवड्यात कारवाईचा दणका बसूनही गांजा तस्करांनी पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न केला मात्र शहर पोलिसांनी तो प्रयत्न अक्षरशः मोडून काढला. मंगळवार, दि. १७ रोजी दुपारी केलेल्या कारवाईत मुन्ना अब्बास शेख (वय २६, रा. काशीआई मंदिराजवळ, लक्ष्मी नगर, रुद्राक्ष कॉलनी, गुंजाळवाडी राजापूर रोड, आणि संजय उर्फ संदीप राजू माळुंजकर (वय २६, रा. संजय गांधी नगर) यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाणे संगमनेर येथे  बुधवार दि १८ लाख मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत २४,९२५ किमतीचा गांजा जप्त करून तस्करांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. अमली पदार्थ विक्रीप्रकरणी एनडीपीएस कायदा कलम ८(क) सह २२ (ब) २( अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस कर्मचारी सागर नागरे यांनी फिर्यादी दिली असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी भेट देत कारवाईचे नेतृत्व केले.

या कारवाईमध्ये ९६५ ग्रॅम २४१२५ तर ३२ ग्रॅमचे पाऊच ८०० रुपये किमत असा एकूण ९९७ ग्रॅम चा तब्बल २४ हजार ९२५ रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक समीर बारवकर उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस पथकाचे पोलीस खुळे, पांडे, आगलावे ,उंडे ,नागरे यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करीत आहेत.

----- Advertisements -----

जीवन हे एक प्रवास आहे, गंतव्य नव्हे.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin