ब्रेकिंग न्यूज :
भारत

शहराच्या गजबजलेल्या सोसायटीत पहाटे बिबट्याच्या पिल्लाची थेट घरात घुसखोरी; महिलांची पाचावर धारण; नागरिक भयभीत: वनविभागाचे युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन

Blog Image
एकूण दृश्ये: 593

शहराच्या गजबजलेल्या सोसायटीत पहाटे बिबट्याच्या पिल्लाची थेट घरात घुसखोरी; महिलांची पाचावर धारण; नागरिक भयभीत: वनविभागाचे युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन

   संगमनेर (प्रतिनिधी)

शांततेच्या आड लपलेला धोका आज बिबट्याच्या पिल्लू दिसताच उघड्यावर आला! कुंथुनाथ सोसायटीत सकाळी ९ वाजताच्या वेळी बिबट्याच्या पिल्लाचे थेट घरात प्रवेश झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले.

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या बिबट्यांच्या हालचालींनी नागरिक आधीच धास्तावले असताना, आजचा प्रकार म्हणजे शहरी वस्तीत थेट धोक्याचा इशारा मानला जात आहे. गिनी गवत व ऊस काढल्यानंतर बिबट्यांचे लपण्याचे क्षेत्र कमी झाले असले, तरी बिबटे दिशाहीन होऊन वस्तीच्या दिशेने सरकू लागल्याचे आता स्पष्ट झाले आहे. चारच दिवसांपूर्वी सुगाव नर्सरीत बिबट्याचे पिल्लू मृत अवस्थेत आढळून आले होते.

त्यानंतर आज बुधवार, दि. 18 सकाळी ९ ते ९.३० दरम्यान कुंथुनाथ सोसायटीतील सिद्धार्थ ओहरा यांच्या बंगल्याच्या मागील काठवणातून पिल्लू थेट घरात उडी मारून घुसले. घरात पूजा करत असताना बाहेर आलेल्या त्यांच्या पत्नीला अचानक बिबट्याचे पिल्लू दिसताच क्षणात गोंधळ उडाला. काही मिनिटांतच परिसरात धावपळ, आरडा ओरडा आणि भीती पसरली.

----- Advertisements -----

घटनेची माहिती मिळताच वन विभाग तातडीने सक्रिय झाला. वनविभागाचे अधिकारी सागर केदार यांनी सांगितले की, पिंजरे व जाळ्या बसवून सर्च ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी. पिल्लू तात्काळ जेरबंद केले जाईल असे त्यांनी सांगितले. या घरामागील मोठ्या काटवनातून सोसायटीमध्ये घुसखोरी झाल्याचे दिसून येत असून, हे पिल्लू रस्ता भटकलेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. मानवी वस्तीत पहिल्यांदाच अशा प्रकारे पिल्लाचे आगमन झाल्याने चिंता वाढली आहे.

वनपाल परते, वनरक्षक पारधी व पडोळे यांच्या नेतृत्वाखाली पथक रेस्क्यूसाठी तैनात असून, तात्काळ जेरबंदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिक तसेच महिलांनी घाबरून जाता दक्षता घ्यावी, बिबट्याच्या हलचाली बाबत अथवा कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास तात्काळ वन विभागास कळवावे असे आवाहन वन विभागाचे अधिकारी सादर केदार यांनी केले आहे.

समजूतदारपणा ही जीवनाची खरी शिकवण आहे.

संत तुकाराम
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin