संगमनेरात ‘सायलेन्सर दहशत’! कर्णकर्कश बुलेटस्वारांचा उच्छाद;
भन्नाट बुलेट, विना नंबर प्लेट; कारवाईला का होतोय लेट ? गाड्या पकडा थेट ?
नागरिकांचा संताप उसळला
संगमनेर (प्रतिनिधी) :
नगर रोड, मेनरोड, बसस्थानक परिसर तसेच पुणे नाशिक आणि पुणे नगर मार्गावर बुलेट दुचाकीस्वारांनी अक्षरशः कर्णकर्कश आवाजाची चांगलीच दहशत माजवली आहे. मुद्दाम बदल केलेले सायलेन्सर लावून ‘फट् फट्’ फाँट फाट असा कानठळ्या बसवणारा आवाज करत शहरभर फेऱ्या मारणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

दिखाव्यासाठी आणि स्टंटबाजीसाठी केलेला हा प्रकार आता सामान्याच्या सहनशक्तीबाहेर गेला आहे. विशेष म्हणजे या परिसरात अनेक रुग्णालये असल्याने ॲम्बुलन्सच्या सायरनचा आवाज नागरिकांना रोजच ऐकावा लागतो. त्यात भर म्हणून या बदललेल्या सायलेन्सरचा कर्णकर्कश गडगडाट ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, व्यापारी रूग्णांसाठी मानसिक त्रासाचे कारण ठरत आहे. रुग्णालय परिसरात वाढता धोका अचानक होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे हृदयाचे ठोके धडधडतात, मागे एकदा या आवाजाने एका व्यक्तीला जीव गमवावा लागला तर आता या फाट फाट आवजाने तणाव निर्माण होणारे प्रकार घडत आहेत. व्यापाऱ्यांनाही ग्राहकांशी संवाद साधताना अडथळा होत असल्याची तक्रार आल्या आहेत
कधी नंबर तर कधी नंबर प्लेटच गायब मग जबाबदारी कोणाची अनेक दुचाकी रस्त्यावर धावताना दिसत आहेत. नियमांचा सर्रास भंग करत काहीजण कायद्यालाच आव्हान देत असल्याचे चित्र आहे. “डेसिबलच्या नावाखाली डीजेवर बंदी घालणारे प्रशासन या सायलेन्सर दहशतीकडे का दुर्लक्ष करतात असा थेट सवाल नागरिकांकडून केला जात आहे. यापूर्वी पोलिसांनी अशा बदललेल्या सायलेन्सरवर विशेष मोहीम राबवून जप्ती, दंड करत सायलेन्सवर दबई (रोलर) फिरवत कठोर कारवाई केली होती. मात्र सध्या ती मोहीम थंडावल्याचे दिसून येते. परिणामी काही बुलेटस्वार निर्भयपणे शहरात आवाज वाढवताना दिसतायेत. तर नागरिक म्हणतात असे बदललेले सायलेन्सर तात्काळ जप्त करावेत,विना नंबर प्लेट वाहनांवर कठोर कारवाई करावी, रुग्णालय परिसर सायलेन्स झोन म्हणून कडक अंमलबजावणी करावी. असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

