सामाजिक कार्यकर्त्यांनी सतत अपडेट झाले पाहिजे :- जयदेव डोळे
[ गौरव समितीच्या वतीने व्याख्यान ]
संगमनेर { प्रतिनिधी }
सध्याच्या राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते , सेवक यांनी आपल्या समोरील आवाहने स्वीकारून परिवर्तन करत दररोज स्वतःच्या ऑनलाईन माध्यमातून अपडेट लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे. स्वतःचे वेबसाईटवर डीजीटल आपली स्वतःची शक्ती निर्माण केली पाहिजे. राजकारण , धर्मकारण , समाजकारण , अर्थकारण या वेगळ्या भूमिका आहे हे आपण समजून घेतले पाहिजे असे मौलिक प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक व्याख्यते जयदेव डोळे यांनी केले.
यावेळी राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा कांदाळकर तसेच प्रमुख पाहुणे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार. डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मा.रा. लामखडे ,शिक्षक नेते हिरालाल पगलाल सर , सिताराम राऊत यांसह पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीचे अनेक मान्यवर मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रसेवा दलाच्या स्थापणेपासून राष्ट्रसेवा दलाचा विशिष्ट उद्देश होता. त्यामध्ये बाल आणि किशोरवयीन मुलांसाठी अधिवेशने घेणे , त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती ,संविधान जागृती ,स्वातंत्र्य , समता , बंधुता ,न्याय , पर्यावरण जागृती आणि सामाजिक जाणीव निर्माण होण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून तरुणांना नवीन संधी निर्माण करण्याचे काम राष्ट्रसेवा दलाकडून होत असे. मात्र आता २१ व्या शतकात सामाजिक कार्यकर्त्यांपुढील आव्हाने काळानुसार वेगळी झालेली आहेत. पर्यावरण, बोलीभाषा यांचे संवर्धनासठी काम केले पाहिजे. कार्यकर्त्यांनी कितीही आव्हाने आली तरी आपला समतावादी , संविधानवादी विचार बाजूला सोडता कामा नये. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते नंतर विविध राजकीय पक्षांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करताना दिसत आहे. आजचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार मुस्लिमविरोधी , दलितविरोधी , आदिवासी विरोधी ,महिला विरोधी धोरणे निर्मिती करून अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचे सरकार प्रत्येक गोष्ट , प्रत्येक बाब धर्माशी , संस्कृतीशी आणि इतिहासाची जोडत असून तरुणांची माथे भडकावत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विविध पुस्तकांच्या माध्यमातून संविधान विरोधी विचार पेरताना दिसत आहे. प्रत्येकाच्या समोर संविधान असेल तर , आपले स्वतःचे अधिकार आणि कर्तव्य प्रत्येक व्यक्तीला समजतील.त्यासाठी प्रत्येक घरामध्ये ,शाळा , महाविद्यालय , ग्रंथालयामध्ये मूळ संविधानाची प्रत ठेवणे आवश्यक आहे.असे सांगत त्यांनी एक प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यां पुढील आव्हाने या विषयावर जयदेव डोळे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी देखील आपली मनोगते व्यक्त करत असताना राष्ट्र सेवा दल ही आजच्या परिस्थितीमध्ये अत्यंत गरजेची संस्था आहे. कारण राष्ट्र सेवा दलाने प्रथमपासूनच संविधानवादी ,समतावादी , पुरोगामी आणि नेहमीच डाव्या विचारांचा कार्यकर्ता निर्माण केला. म्हणून आमचे कर्तव्य आहे की राष्ट्र सेवा दलाच्या बरोबर आम्ही उभे राहिले पाहिजे. यापुढे देखील आम्ही राष्ट्र सेवा दलाच्या प्रत्येक कार्यात सहभागी राहू असे आश्वासित केले. तसेच शिक्षक नेते हिरालाल पगडाल सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रा सेवा दलाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष राजा कांदळकर यांनी देखील आपली मनोगते व्यक्त करत असताना आज एकूण राष्ट्रीय पातळीवर किंवा प्रादेशिक पातळीवर जी विविध प्रकारची संकटे , समस्या निर्माण झालेल्या आहे. याविषयी सर्वांना बरोबर घेऊन वेगवेगळे उपक्रम राबऊ असे सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. मा.रा. लामखडे यांनी आजचा राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष राजा कांदाळकर हे संगमनेर महाविद्यालयामध्ये मी सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी उपक्रम चालवत होतो. त्याचे हे विद्यार्थी आहे याचा मला विशेष आनंद आणि अभिमान आहे. आज बोली भाषा नामशेष होत आहे आणि एक दिवस त्या पूर्ण नाहीशा होतील अशी भीती वाटते. त्याचे जतन संवर्धन करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. यासाठी राजा कांदळकर प्रयत्न करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन ॲड. समीर लामखडे यांनी केले तर आभार काकड यांनी मानले.