व्याख्यानमाला

महाराष्ट्रातील लोकांना छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, छत्रपती शाहू, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही :- प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर

Blog Image
एकूण दृश्ये: 198

महाराष्ट्रातील लोकांना छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, छत्रपती शाहू , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही :- प्रा. डॉ.प्रल्हाद लुलेकर

    संगमनेर प्रतिनिधी

शेअर मार्केट कसे असते ? उद्योग कसे करावेत ? हे ज्योतिबांनी त्याकाळी सांगितले होते. विकासाची फार स्वप्न पाहू नका. हा देश मोडीत काढला जाणार आहे. कारण सुप्रीम कोर्टाचेही निकाल संविधानानुसार येतात का ? असा प्रश्न करत या न्यायसंहितेने हरामखोरी लावली. असे सांगत डॉ. बाबासाहेबांमुळे हा देश मोठा झाला. परंतु आता या देशाचे काही खरे नाही. जोपर्यंत आम्ही संविधान अंगिकारू शकत नाही तो पर्यंत येथे लोकशाही टिकणार नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही असे परखड मत प्रा. डॉ प्रल्हाद लुलेकर यांनी व्यक्त केले. 

      संविधानाचा अमृत महोत्सव आणि माजी मंत्री दादासाहेब रूपवते यांचा जन्म शताब्दी सोहळा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मालपाणी लॉन्स , संगमनेर येथे अध्यक्षीय स्थानावरून डॉ. लुलेकर बोलत होते.

 ते म्हणाले की, संविधानाने दैवी शक्तीला कधीच मान्यता दिली नाही. देव, धर्म, ईश्वर, बाजूला ठेवा स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही संविधानाची मूल्य आहेत. यामध्ये भेद ठेवू नका. संविधान हे श्रध्देचा विषय नाही तर तो लोकशाही तत्त्वाचा खरा राष्ट्रीय ग्रंथ आहे. फक्त मागासवर्गीय, आदिवासी ,महिला , कामगार यांनीच समजून घेण्याची अपेक्षा न करता देशातील सर्वांनीच संविधानाची मूल्य समजून घेऊन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जगली पाहिजे , जपली पाहिजे. 

----- Advertisements -----

कार्यक्रमाचे आयोजन बहुजन शिक्षण संघ , अहिल्यानगर , पुस्तक मार्केट पब्लिकेशन आणि सुजात फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले होते. सदर कार्यक्रम दोन सत्रात आयोजित केला होता. सकाळच्या सत्रामध्ये प्रथमता चळवळीची गाणी विकास भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. संघराज रूपवते , उद्घाटक माजी आमदार लहू कानडे , प्रमुख पाहुणे माजी मंत्री बाळासाहेब थोरात , कार्याध्यक्ष माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे ,वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ता उत्कर्षाताई रूपवते   कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.प्रल्हाद लुलेकर होते. दुपारच्या सत्रामध्ये भारताचे संविधान आणि आजचे समकालीन वास्तव या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. परिसंमादामध्ये प्रा. डॉ. सुरेंद्र जोंधळे, प्रा. डॉ. श्रीरंजन आवटे ,प्रा. डॉ. मिलिंद कसबे आणि प्रा. डॉ. राहुल गोंगे उपस्थित होते. शेवटी दादासाहेब रुपवते यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने सामाजिक , राजकीय ,शैक्षणिक , धम्माच्या चळवळीत काम करणाऱ्या १०० सन्माननीय लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 वणवा पेटलेला आहे. त्यास विझविण्याचे काम केले पाहिजे :- बाळासाहेब थोरात

सर्व समविचारी लोकांनी  एकत्र बसले पाहिजे हीच खरी काळाची गरज आहे. राजकारणाला दिशा देण्यास आपण कमी पडतो का ? लोकांना सोबत घेण्यात कमी पडतो का ? सोशल मीडिया, पैशाच्या आधारावर आपण कमी पडतो का ? अशी खंत व्यक्त करीत आता चातुर्वर्ण्य परिस्थिती येईल का याची भीती वाटते. संविधानाच्या भरोशावर वागणारे, आणि सत्तेत येणारे तेच संविधानाच्या विरोधात आहे. धर्म भेद करणे हे साधन आहे.? हा वणवा पेटलेला आहे. त्यास विझविण्याचे काम केले पाहिजे असे ठाम मत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केले.

 आर.एस.एस.चा धोका लक्षात घेतला पाहिजे :- डॉ. सुधीर तांबे

भारतचे संविधान आय सी यू मध्ये आहे. गैरविचाराने प्रागतिक चळवळीला जिवंत ठेवले नाही. अनेक प्रतिक्रांती झाल्या. आर एस एस चा धोका आहे हे लक्षात घेतले पाहिजे असे डॉ सुधीर तांबे म्हणाले. 

----- Advertisements -----

 भारताचे प्रतिनिधित्व डॉ बाबासाहेबांनी केले : - लहू कानडे

या देशाला लोकशाही माहीत नव्हती ती संविधानाने दिली. समता दिली, बंधुभाव दिला, सामाजिक न्यायाचे तत्त्व दिले, परिवर्तनाची दिशा देणारे काम फूले - शाहु - आंबेडकरी विचारच या देशातील सर्व प्रश्नांचे उत्तर असेल. म्हणून सर्वांनी मिळून संविधानाचा जागर अमृत महोत्सवी वर्षात केला पाहिजे. असे मत माजी आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केले.

 इतिहासाच्या नोंदी बायस आहेत :- ॲड. संघराज रूपवते

केशवसुत हे मराठी कवितेचे जनक मानले जातात. परंतु त्यांच्या आधी 31 वर्षांपूर्वी सावित्रीबाईंनी क्रांतिची कविता लिहिली. त्या आद्य शिक्षिके बरोबरच समाज सुधारक होत्या. कोणी म्हणतय, संविधान हे मनुस्मृतिचा मृत्यूलेख आहे, तर कोणी म्हणतय ही डॉ. बाबासाहेब स्मृती आहे. कारण हे सर्व पूर्वग्रह दूषित आहे. विशेषत्वेकरून भारतीय लोकांना अजून संविधान समजले की नाही ? हा प्रश्न मला सतत भेडसावत राहतो. याची आठवण करून देत, देशात वेगवेगळे पद्धतीने वस्तरे लावले जात असल्याने या देशाचे संविधान धोक्यात येईल असे मत विधीज्ञ ॲड. संघराज रूपवते यांनी व्यक्त केले.

येणारा काळ आव्हानाचा आहे : -  उत्कर्षा रूपवते

----- Advertisements -----

दादासाहेबांनी नवोदितांना आणि समवयस्कांना दिशा देण्याचे काम केले. ते एक अजब रसायण होते. वंचिताच्या मूलभूत शिक्षणाची लढाई, समतेचा लढा हा अविरत सुरूच ठेवला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले ,छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवराय यांच्या विचारावर आपण मार्गक्रमण करीत पुढे गेले पाहिजे. कारण पुढे येणारा काळ आव्हानाचा आहे असे परखड मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केले.

 १०० मान्यवरांचा केला पुरस्कार देऊन केला सन्मान

संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक ,वैद्यकीय, राजकारण धम्माचे  काम करणाऱ्या  विविध क्षेत्रातील माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत तसेच दादासाहेब रूपवते यांच्या बरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांना तसेच बहुजन शिक्षण संघ या संस्थेच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या १०० मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या आणि कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षा उत्कर्षाताई रुपवते यांनी केले तरसंपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भगवान अहिरे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन महोत्सव समितीने केले होते. त्यामध्ये के.जी. भालेराव , सूर्यकांत शिंदे ,डॉ. रवींद्र घोसाळे ,विनय घोसाळे व्ही.पी. गायकवाड आदींनी केले.

----- Advertisements -----

आपण जे विचार करतो, ते आपण होतो.

भगवद्गीता
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin