तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय संगमनेर अंतर्गत कोतवाल पद भरती सन -2025 जाहीरप्रसिद्धी होणेबाबत
संगमनेर ( प्रतिनिधी )
याद्वारे सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील संदर्भीय पत्रानुसार तहसील कार्यालय ,संगमनेर अंतर्गत कोतवाल या सवर्गाची रिक्त पदांपैकी 80 टक्के मर्यादित अनुक्रमे १) कवठे बुद्रुक २) वडझरी बुद्रुक ३) सांगवी ४) चिंचपूर बुद्रुक ५)जवळेबळेश्वर ६) मालदाड ७) निळवंडे ८)पारेगाव बुद्रुक ९)चिखली १०) निमोण ११) सुकेवाडी १२) आंबे खालसा १३) आंबे दुमाला १४) संगमनेर खुर्द १५) कोकणगाव १६) धांदलफळ बुद्रुक या सजेची एकूण सोळा पदे रिक्त आहे.
उक्त नमुद सजा करिता एकूण १६ कोतवाल पदांची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत कोतवाल निवड समितीचे अध्यक्षतेखाली दिनांक 11.2.2025 रोजी सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर (प्रांत कार्यालय यशवंतराव चव्हाण सभागृह संगमनेर) येथे काढण्यात येणार आहे. तरी सदर आरक्षण प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याकरिता इच्छुक नागरिकांनी वरील नमूद दिनांक वेळ व ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर तहसीलचे माननीय तहसीलदार साहेब यांनी केले आहे.
सदरच्या कोतवाल पदांबाबत त्या त्या गावातील किंवा पंचक्रोशीतील इच्छुक शैक्षणिक पात्रता तसेच शासकीय पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी सदरच्या शासनाच्या कोतवाल पदाचा फायदा करून घ्यावा.
----------------------------------------------------------
ॲड. विकास जगताप सर
मो. 9922876008 / 8999503447
----------------------------------------------------------
आपणास विनंती आहे की , अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या हक्काच्या -
राजगृह न्युज चॅनलला -
https://rajgriha.in/
युट्युब चॅनेलला -
https://youtube.com/@prof.vikasb.jagtapsir.7282?si=7hRUIOgJNM4lqyLl
फेसबुक पेजला -
https://www.facebook.com/share/18JqJ2BzDU/
जास्तीत जास्त लोकांनी लोकांपर्यंत
# लाईक करा @
# शेअर करा @
# सबस्क्राईब करा @
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏