शासकीय

पतीसाठी ती झाली शेरणी! पत्नीने वाचवले पतीचे प्राण ;

Blog Image
एकूण दृश्ये: 698

पतीसाठी ती झाली शेरणी! पत्नीने वाचवले पतीचे प्राण ; तासभर बिबट्याशी दिली झुंज ; मरणाच्या दारातून आणले सत्यवानासारखे आणले चंदुला ; नंदा ठरली रणरागिणी; संगमनेर चंदनापुरीतील चित्तधरारक घटना 

       संगमनेर { प्रतिनिधी }

जीवनात अनेक संघर्ष येतात आणि अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ग्रामीण भागात एका महिलेने धाडस करून बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या पतीला वाचवल्याची एक रोमांच उभी करणारी घटना घडली. 

                  8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन. कार वस्ती चंदनापुरी संगमनेर येथे गुरुवारी मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास बिबट्याने बांधलेल्या चार पाच शेळ्यांवर जबरदस्त हल्ला केला.. शेळ्यांचा मोठमोठ्याने आवाज आल्याने नंदाने आपले पती चंदू यांना उठविले आवाजाच्या दिशेने चंदू ने जाण्याचा प्रयत्न करताच बिबट्याने शेळ्यांचा हल्ला सोडून थेट चंदूवर हल्ला करत चंदूला खाली पाडले. चंदूच्या हाताला चावा ही घेतला आणि गळ्याकडे जाण्याचा प्रयत्न करता असतांनाण ररागिणी असलेल्या नंदाने आपल्या पती देवासाठी शेरनीचे रूप धारण करून बिबट्याचे शेपूट वाढण्याचा प्रयत्न केला ताकतीने जबरदस्त असलेले धूड चंद्राला भारी पडत असल्याचे जाणवले बिबट्या पंचानी मारतो तसेच नंदानेही या बिबट्याला च्या तोंडावर पंजाने मारण्याचा प्रयत्न करून त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला एकीकडे पती आणि दुसरीकडे पत्नी आणि बिबट्याच्या एक तास चाललेल्या या तुंबळ युद्धामध्ये रणरागिनीने आपली ताकद एकवटून मेंढपाळ रणरागिणीने जीवाची पर्वा न करता तब्बल तासभर थेट बिबट्याशी झुंज दिली आणि अखेर पतीला बिबट्याच्या तावडीतून पती देवाची सुखरूप सुटका करण्यासाठी नंदाला अखेर यश मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदनपुरी येथील चंदू पुंजा दुधवडे आणि त्यांची पत्नी नंदा हे कार वस्ती परिसरात मेंढ्या चरत होते. बुधवारी सायंकाळी त्याने आपल्या सर्व मेंढ्या बाडात बंद केल्या होत्या. रात्रीचे जेवण करून जोडपे झोपायला गेले. गुरुवारी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान बिबट्याने थेट वाघूरमध्ये उडी घेतली. मेंढ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मेंढ्यांच्या मोठ्या आवाजाने मंदा जागी झाली आणि तिने पती चंदू यालाही झोपेतून उठवले मात्र यावेळी बिबट्याला मेंढ्यातून बाहेर पडणे कठीण झाले. त्यामुळे बिबट्याने थेट चंदूवर उडी मारून त्याला खाली पाडले. बिबट्याने डाव्या हाताला चावा घेतल्याने चंदू जोरात ओरडला. त्यामुळे पत्नी नंदा आवाजाच्या दिशेने धावली असता पतीच्या अंगावर बिबट्या बसल्याचे दिसले. यावेळी नंदाने जीवाची पर्वा न करता थेट बिबट्यावर उडी घेत तिने शेपूट जोरात ओढायला सुरुवात केली पण तरीही बिबट्या चंदूला चावत होता. यावेळी नंदाने थेट बिबट्याचे डोके पकडले. यानंतर त्याला काठीने मारले नंदा यांनी सुमारे तासभर बिबट्याशी झुंज देत आपल्या पतीला मरणाच्या दारातून परत आणले.

दरम्यान, जवळच असलेले मधुकर रहाणे, बाबासाहेब रहाणे, शंकर रहाणे, बबन रहाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती गावचे सरपंच भाऊराव रहाणे यांना समजताच त्यांनी घटनास्थळ गाठून जखमी चंदूला तातडीने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी संगमनेर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. 

----- Advertisements -----

डॉ.प्रदीप कुटे :- सदर व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंदूच्या दोन्ही हाताला गंभीर जखमा झाल्या असून उपचार सुरू आहेत तसेच प्रकृती ठीक असून औषधोपचार सुरू आहेत. भीती बाळगण्याचे अथवा घाबरून जाण्याच कोणतेही कारण नाही असे डॉ.प्रदीप कुटे यांनी सांगितले.   

नंदा दुधवडे सांगितला बिबट्याच्या चित्तथरारक अनुभव --बिबट्याने धूम ठोकली, पतीला खाली पाडले आणि त्याच्या हातावर जोरात चावा घेतला. त्यावेळी जीवाची पर्वा न करता त्यांनी दोन्ही हातांनी बिबट्याची शेपटी ओढली मात्र बिबट्याने त्याच्या मानेवर उडी मारून त्याच्या चेहऱ्यावर हल्ला केला. तसेच बिबट्याने माझ्यावर हल्ला केला, तरीही मी न घाबरता बिबट्यावर मी पण हल्ला केला. त्यामुळे त्याने धूम ठोकत पळून गेला. माझ्या पतीचा जीव वाचवण्यात यशस्वी झाले .अशी भावना नंदा दुधवडे यांनी व्यक्ती केली. 

वनविभागाने दाखवली तत्परता ;- वनसंरक्षक विक्रांत बुरांडे म्हणाले की, बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच विभाग एकचे वन परिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नामदेव ताजणे यांच्यासह आम्ही सर्वजण घटनास्थळी गेलो दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात दोन पिंजरे लावले आहेत. यासाठी आम्हाला नागरिकांचे पूर्ण सहकार्य मिळत आहे. तसेच सकाळी बिबट्याने मारलेल्या मेंढ्यांचाही घटनास्थळी पंचनामा केला असून बिबट्याला लवकरच जेरबंद केले जाईल असे सांगितले. दुधवडे कुटुंबाला हवी ती मदत केली जाईल. 

चार शेळ्यावर हल्ला दोन ठार :-या बिबट्याने चार शेळ्यावर हल्ला केला या पैकी दोन शेळ्या ठार झाल्या असून अन्य दोन गंभीर जखमी झाल्या आहेत.

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin