विविध प्रबोधनातून ऊर्दू भाषा दिवस उत्साहात साजरा
संगमनेर:-
सालाबाद प्रमाणे भारताचे जेष्ठ कवी ऊर्दू शायर मिर्झा गालिब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समनापूर जि.प. ऊर्दू शाळा येथे जवाहरलाल नेहरू ऊर्दू सेंटरच्या वतीने ऊर्दू सप्ताह साजरा करण्यात आला. प्रामुख्याने दररोज सांस्कृतिक कार्यक्रम विध्यार्थ्यांनी प्रस्तुत केले,त्यात मुशायरा, कवी संमेलन,हॅंड एक्स्प्रेशन देशभक्ती, सफाई, सोशल मीडियाचे दुष्परिणाम इत्यादी कार्यक्रम सादर केले समारोप ऊर्दू दिवस म्हणून साजरा केला.या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष शेख साजिद हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समनापुरच्या सरपंच कमलताई बर्डे होते. जवाहरलाल नेहरू ऊर्दू सेंटरच्या वतीने अध्यक्ष शेख ईदरीस व उपाध्यक्ष सय्यद असिफ अली यांनी मुख्याध्यापिका शेख आफ्रिन मोहम्मद, शेख तरन्नूम, शेख तस्लिमा,शाहिस्ता, रेशमा व सईद सर या सर्व शिक्षकांचा शाल बुके देवुन सत्कार केला.यावेळी शेख ईदरीस, सय्यद असिफ अली, शाळा समितीचे अध्यक्ष शेख साजिद मुख्याध्यापिका शेख आफ्रिन मोहम्मद इत्यादींचे भाषणे झाली.या कार्यक्रमात, शेख हबीब, शेख वसीम, शेख असिफ, सय्यद इर्शाद विध्यार्थी विध्यार्थींनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका शेख आफ्रिन मोहम्मद व सर्व शिक्षिकांनी परिश्रम घेतले.