*दिल्लीत 'पुन्हा एकदा लंडन'*
संगमनेर { प्रतिनिधी }
दिल्ली येथे होण्याच्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात हिरालाल पगडाल यांच्या 'पुन्हा एकदा लंडन' या पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीत होणार आहे. पुणे येथील चपराक प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून साहित्य संमेलनाचे प्रमुख संयोजक आणि सरहद्द संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. 'पुन्हा एकदा लंडन' हे हिरालाल पगडाल यांचे चौथे पुस्तक असून या पुस्तकात पगडाल यांच्या युरोप दौऱ्याचे प्रवास वर्णन आहे. श्री. पगडाल यांनी हे पुस्तक इंग्लंडमध्ये लिहिलेले आहे. इंग्लंड, बेल्जियन, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रांस आदी युरोपातील देशातील प्रेक्षणीय स्थळे, लोकजीवन, व्यापार, संस्कृती याचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याचे वर्णन पगडाल यांनी या पुस्तकात केले आहे. जग एक मोठे खेडे बनू पहात आहे याची प्रत्यक्ष अनुभूती पगडाल यांना या निमित्ताने आली. 'ग्लोबल व्हिलेज' ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होतांना दिसली. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण यांमुळे गेल्या तीस चाळीस वर्षात जे बदल घडून आले आहेत. त्याची दखल पगडाल यांनी घेतली आहे. दि. २२ फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलनाच्या सकाळच्या सत्रात या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून अ. भा. मराठी संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर, खा. भास्करराव भगरे, खा.भाऊसाहेब वाकचौरे, प्रकाशक घनश्याम पाटील, पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटणाऱ्या ज्योती पाटील, संमेलनाचे प्रमुख संयोजक संजय नहार, प्रसिध्द साहित्यिक दिलीप,फडके, रा. ना. पराडकर, संदीप वाकचौरे आदी हजर राहणार आहेत.