साहित्य

हिरालाल पगडाल लिखीत 'पुन्हा एकदा लंडन' या पुस्तकाचे दिल्ली येथील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन होणार.

Blog Image
एकूण दृश्ये: 410

हिरालाल पगडाल लिखीत 'पुन्हा एकदा लंडन' या पुस्तकाचे दिल्ली येथील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन होणार.

संगमनेर (प्रतिनिधी)

दिल्ली येथे होण्याऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात हिरालाल पगडाल यांच्या 'पुन्हा एकदा लंडन' या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. पुण्याच्या चपराक प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून साहित्य संमेलनाचे प्रमुख संयोजक आणि सरहद्द संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. 

'पुन्हा एकदा लंडन' हे हिरालाल पगडाल यांचे चौथे पुस्तक असून या पुस्तकात पगडाल यांच्या युरोप दौऱ्याचे प्रवास वर्णन आहे. श्री. पगडाल यांनी हे पुस्तक इंग्लंडमध्ये लिहिलेले आहे. 

----- Advertisements -----

   

इंग्लंड, बेल्जियन, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रांस आदी युरोपातील देशातील प्रेक्षणीय स्थळे, लोकजीवन, व्यापार, संस्कृती याचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याचे वर्णन पगडाल यांनी या पुस्तकात केले आहे.

    जग एक मोठे खेडे बनू पहात आहे याची प्रत्यक्ष अनुभूती पगडाल यांना या निमित्ताने आली. 'ग्लोबल व्हिलेज' हि संकल्पना प्रत्यक्षात साकार होतांना दिसली. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण यांमुळे गेल्या तीस चाळीस वर्षात जे बदल घडून आले आहेत. त्याची दखल पगडाल यांनी घेतली आहे. सदर पुस्तकामध्ये युरोपीय कला , संस्कृती , साहित्य , शिक्षण , विज्ञान , प्रशासन आदिबददलची सविस्तर चित्रण केलेले आहे. सदरच्या पुस्तकाबद्दल हिरालाल पगलाल सरांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.

    दि. २२ फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलनाच्या सकाळच्या सत्रात या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून त्यावेळीअ. भा. मराठी संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर, खा. भास्करराव भगरे, खा.भाऊसाहेब वाकचौरे, प्रकाशक घनश्याम पाटील, पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटणाऱ्या ज्योती पाटील,संमेलनाचे प्रमुख संयोजक संजय नहार, प्रसिध्द साहित्यिक दिलीप,फडके, रा. ना. पराडकर, संदीप वाकचौरे आदी हजर राहणार आहेत.

------------------------------------------

----- Advertisements -----

ॲड. विकास जगताप सर

 मो. 9922876008 / 8999503447

------------------------------------------

आपणास विनंती आहे की , अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या हक्काच्या -

 

----- Advertisements -----

 राजगृह न्युज चॅनलला -

 https://rajgriha.in/

 

 युट्युब चॅनेलला -

https://youtube.com/@prof.vikasb.jagtapsir.7282?si=7hRUIOgJNM4lqyLl 

----- Advertisements -----

 

 फेसबुक पेजला -

https://www.facebook.com/share/18JqJ2BzDU/

 

 व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा -

----- Advertisements -----

https://chat.whatsapp.com/HjMw7i3tZZ0K9okXPm9KHi

 

 व्हॉटसॲप चॅनलला -

https://whatsapp.com/channel/0029Vasu8HZIt5s4Z3apXH45

 

----- Advertisements -----

 जास्तीत जास्त लोकांनी लोकांपर्यंत

 

 # लाईक करा @

 # शेअर करा @ 

 # सबस्क्राईब करा @

----- Advertisements -----

 

 कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..

----- Advertisements -----

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin