कृषी

सातबारा, ८अ, फेरफार आदींसह अन्य सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर, वाचा सविस्तर

Blog Image
एकूण दृश्ये: 269

👉 आता भूमि अभिलेखची नवीन वेबसाईट उपलब्ध झाली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला नेमकं काय काय पाहता येणार आहे. जाणून घेऊयात या सविस्तर लेखातून...

 

▪️https://bhulekh.mahabhumi.gov.in/NewBhulekh/NewBhulekh.aspx ही वेबसाईटची लिंक आहे.

▪️ही वेबसाईट फ्री असून यात गाव नमुना नंबर, सातबारा, 8 अ, 8 ड, मालमत्ता पत्रक या प्रकारची माहिती पाहू शकता.

▪️सातबारा पाहण्यासाठी प्रॉपर्टीचा यूआयडी नंबर असेल तर यूआयडी नंबर, मोबाईल नंबर टाकून सगळी माहिती पाहता येईल.

----- Advertisements -----

▪️प्रॉपर्टी युआयडी नंबर नसेल तर नाही करून तुम्ही खालील माहितीवर क्लिक करून पाहू शकता.

▪️यात पहिल्या क्रमांकावर सातबारा, दुसरा 8 अ, तिसरा मालमत्ता पत्रक म्हणजे प्रॉपर्टी कार्ड पत्र तर अशा प्रकारची माहिती पाहता येईल.

▪️समजा सातबारा पाहायचा आहे तर सातबारावर क्लिक करा.

▪️जिल्हा निवडा, तालुका निवडा, तुमचं जे काही गावाचं नाव असेल ते गावाचं नाव निवडा.

▪️गट नंबर टाकून सर्च करा. मोबाईल नंबर टाकून, भाषा निवडून कॅप्चा कोड टाकावा.

----- Advertisements -----

▪️यानंतर तुम्हाला सातबारा पाहायला भेटेल.

▪️अशाच पद्धतीने इतरही कागदपत्रांची प्रक्रिया करता येईल .

त्यानंतर https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ ही दुसरी एक वेबसाईट आहे, या ठिकाणी शुल्क आकारले जाते.

▪️ या वेबसाईटवर अनेक ऑनलाईन सेवा आहेत, जसे की सातबारा उतारा पाहणे, 8 अ, मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी काही शुल्क आकारले जाते.

▪️यामध्ये आपल्याला सातबारा उतारा, 8अ उतारा, फेरफार प्रत, मालमत्ता पत्रक, सातबारा फेरफारसाठी अर्ज, मालमत्ता फेरफार अर्ज, फेरफार स्थिती, इत्यादींसह इतरही बाबी आपल्याला तपासता येतात.

----- Advertisements -----

▪️मालमत्ता फेरफार सुद्धा तुम्ही करू शकता.

▪️अशा पद्धतीने एक फ्री सेवा देणारी आणि दुसरी शुल्क आकारणारी अशा दोन स्वतंत्र वेबसाईट सध्या कार्यरत आहेत.

----------------------------------------------------------

 

 *ॲड. विकास जगताप सर* 

----- Advertisements -----

 *मो. 9922876008 / 8999503447* 

----------------------------------------------------------

आपणास विनंती आहे की , अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या हक्काच्या -

 

 *राजगृह न्युज चॅनलला -* 

----- Advertisements -----

 *https://rajgriha.in/* 

 

 *युट्युब चॅनेलला -* 

*https://youtube.com/@prof.vikasb.jagtapsir.7282?si=7hRUIOgJNM4lqyLl* 

 

----- Advertisements -----

 *फेसबुक पेजला -* 

*https://www.facebook.com/share/18JqJ2BzDU/* 

 

 *जास्तीत जास्त लोकांनी लोकांपर्यंत* 

 

----- Advertisements -----

 *# लाईक करा @* 

 *# शेअर करा @* 

 *# सबस्क्राईब करा @* 

 

 *कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..*

----- Advertisements -----

 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जीवनात यशस्वी होण्यासाठी धैर्य आवश्यक आहे.

सावरकर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin