श्री गजानन महाराज प्रगट दिन साजरा; संत भेट पालखी ने वाढविली रंगत; हजारो भाविकांनी घेतला सोहळ्याचा आनंद
संगमनेर { प्रतिनिधी }
प्रवरा म्हाळुंगीच्या संगम तटावर वसलेल्या श्री गजानन महाराज मंदिरात प्रगट दिन व पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गेल्या तेवीस वर्षांपासून श्री गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने साईनगर, येथे यंदाही हा सोहळा गुरुवार, दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
मंदिराचे प्रमुख श्री मोरेश्वर रामचंद्र भुसनळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यात श्रीं चा अभिषेक, गणेश याग, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. श्री साईबाबा व स्वामी समर्थ संत भेट घडविण्यात आली पालखी ने रंगत वाढविली सदर पालखी श्री गजानन महाराज मंदिरातून साईबाबा तसेच स्वामी समर्थ रंगार गल्ली कॅप्टन लक्ष्मी चौक नगरपालिके मार्ग पालखीने पुन्हा श्री गजानन महाराज मंदिराकडे प्रस्थान केले. पालखीचे जागोजाग स्वागत करण्यात आले. हजारो भाविकांनी सोहळ्याचा आनंद घेत पालखी पुढे पुढे जात होती.
श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत, भक्तांवर कृपा दृष्टी राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. या सोहळ्याचे यशस्वी आयोजन श्री गजानन महाराज भक्त परिवाराने केले. भाविकांच्या उदंड प्रतिसाद पहावयास मिळाला अलोट गर्दीने परिसर दुमदुमून गेला हजारो भक्तांनी श्री च्या दर्शनाचा लाभ घेतला.