ब्रेकिंग न्यूज :
मनोरंजन

माजी मंत्री कालकथित दादासाहेब रूपवते स्मृतिदिनानिमित्त मुंबई येथे अभिवादन सभेचे आयोजन

Blog Image
एकूण दृश्ये: 382

माजी मंत्री कालकथित दादासाहेब रूपवते स्मृतिदिनानिमित्त मुंबई येथे अभिवादन सभेचे आयोजन

 संगमनेर (अहिल्यानगर) राजगृह न्यूज

बहुजन शिक्षण संघ आणि दादासाहेब रुपवते फाउंडेशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री कालकथित दादासाहेब रूपवते यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर , मंत्रालयासमोर , मुंबई येथे वार शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजता करण्यात आले आहे.

       

 या अभिवादन सभेच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरदचंद्रजी पवार ,मा. आमदार उल्हास पवार, मा. आमदार शिरीष चौधरी यासह विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे. यासाठी बहुजन शिक्षण संघ संस्थेचे अध्यक्ष मा. बी. आर. कदम, बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त ॲड. संघराज रुपवते , मा. उत्कर्षाताई रुपवते यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील दादासाहेब रुपवते यांची प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रातील राजकीय धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

----- Advertisements -----

कालकथित दादासाहेब रुपावते हे विश्वरत्न ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक क्रांतीच्या लढ्यात त्यांनी वाहून घेतले आणि त्यांचे विश्वासू साथीदार म्हणून शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर कार्य केले. त्यांनी संपूर्ण नगर जिल्ह्यात बहुजन शिक्षण संघाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र क्रांती केली गेली. आज या संस्थेच्या माध्यमातून पुणे ,अहिल्यानगर , संगमनेर येथे विविध महाविद्यालये , विद्यालये आणि मुला - मुलींची विविध  वसतीगृहे कार्यरत आहे. दादासाहेबांनी डॉ. आंबेडकरांकडून राजकीय क्रांतीचे धडे घेतले आणि एकूण महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन राजकीय स्थितीचा अभ्यास करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नंतर काँग्रेस या पक्षांच्या माध्यमातून विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळले आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी अहोरात्र काम केले. एकूणच धार्मिक , शैक्षणिक , सामाजिक , राजकीय क्षेत्रामध्ये दादासाहेबांचे मोठे कार्य आहे.

 दादासाहेबांच्या संपूर्ण विचारांना , स्मृतींना आणि कार्याला उजाळा देण्यासाठी अभिवादन सभा शनिवार दि. 19 जुलै 2025 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह , जगन्नाथ भोसले मार्ग , नरिमन पॉईंट , मंत्रालयासमोर , मुंबई येथे होणार आहे. या अभिवादन सभेस आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. या कार्यक्रमास आपण अगत्य यावे.

----- Advertisements -----

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin