ब्रेकिंग न्यूज :
मनोरंजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान , संगमनेर ( रजि.) यांच्यावतीने सिद्धार्थ नाईट हायस्कूल , संगमनेर येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रम संपन्न

Blog Image
एकूण दृश्ये: 171

🌷 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान , संगमनेर ( रजि.) यांच्यावतीने सिद्धार्थ नाईट हायस्कूल , संगमनेर येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रम संपन्न 🌷

संगमनेर प्रतिनिधी 

बहुजन शिक्षण संघाचे , सिद्धार्थ नाईट हायस्कूल , संगमनेर , जि. अहिल्यानगर येथील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान , संगमनेर (रजि) यांच्या माध्यमातून कुरण गावचे भूषण आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर मान. सुधाकरराव सोनवणे यांचे मदतीतून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये मान. कुसुमताई माघाडे मॅडम - विश्वस्त , मान. के.एस. गायकवाड सर - उपाध्यक्ष , मान. ए.पी. बनसोडे सर - उपाध्यक्ष , मान. गौतम गायकवाड - विश्वस्त , मान.विनोद गायकवाड - अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव , मान. दादा जमधडे सर , विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास जगताप सर ,विद्यालयाचे कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.

----- Advertisements -----

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास जगताप सर यांनी उपस्थित सर्वच मान्यवरांचे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून उपस्थित मान्यवरांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे सामाजिक , शैक्षणिक ,धार्मिक कार्य कशा पद्धतीने चालते याची विद्यार्थ्यांना माहिती देऊन सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि मार्गदर्शक मान. कुसुमताई माघाडे मॅडम यांनी प्रतिष्ठानचे कार्य कशा पद्धतीने सुरू आहे. प्रतिष्ठांची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिष्ठान करत असते असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

 प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ मार्गदर्शक के.एस. गायकवाड सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात त्यांनी सिद्धार्थ नाईट हायस्कूल मध्ये विविध उपक्रम हाती घेतले जात आहे. विद्यालयाचे प्रगती आणि नावलौकिक वाढत आहे याचा आम्हाला अभिमान आहे.

----- Advertisements -----

 

प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ए. पी. बनसोडे सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देत असताना जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्टच तुम्हाला यशापर्यंत पोहोचवेल. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याने आपल्या मनात न्यूनगंड बाळगू नका. प्रत्येक विद्यार्थी निश्चितच एक दिवस यशापर्यंत पोहोचेल असा आशावाद व्यक्त केला.

दैनिक भास्करचे ज्येष्ठ पत्रकार आणि प्रतिष्ठानचे विश्वस्त यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची कशी मदत करता येईल. यासाठी कुरण गावचे भूषण आणि नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकरराव सोनवणे यांचे मदतीतून शालेय साहित्याचे वितरण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे असे सांगितले. यावेळी त्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , क्रांतिसुर्य महात्मा फुले , फातिमा शेख ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा दिला आणि तेच खरे आपले प्रेरणास्थान आहे असे विद्यार्थ्यांना सांगितले. आपल्या जीवनामध्ये तेच आपले आदर्श आहेत असे सांगितले. मान. सुधाकरराव सोनवणे हे संगमनेर येथे एका वेल्डिंगच्या दुकानात वेल्डरचे काम करत असताना आज त्यांनी मुंबई येथे स्वतःची एक कंपनी स्थापन करून साधारणपणे 500 लोकांना आपल्या उद्योगांमध्ये नोकरी दिलेली आहे. . सामाजिक ,शैक्षणिक , राजकीयदृष्ट्या त्याने मानाचे पद मिळविले आहे. हा आदर्श आपण पुढे ठेवून तुमच्या मधील विद्यार्थी निश्चितच सुधाकरराव सोनवणे होतील असा आशावाद व्यक्त केला. सर्वच मान्यवरांनी या रात्र शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच यापुढे देखील विविध प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले.

----- Advertisements -----

सिद्धार्थ नाईट हायस्कूल ,संगमनेर या रात्र शाळेत समाजातील विविध स्तरांतून अर्थात दिवसभर कष्टाची कामे करून अनेक कष्टकरी , कामगार ,मजूर , शेतकरी , महिला , ज्यांचे अर्ध्यावर शिक्षण राहिले आहे आणि पुन्हा त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून ज्ञानदानाचे काम केले जाते. ही मुले खऱ्या अर्थाने गरजवंत आहेत. कारण त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांचे कुटुंब चालविण्यासाठी त्यांना अशी कष्टाची कामे करणे आवश्यक आहे. परंतु शिक्षणाची भूक त्यांची मोठी आहे. म्हणून ते या विद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन आपले भविष्यातील यश मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतात. खऱ्या अर्थाने हे रात्रीच्या प्रकाशात फुलणारे हिरे आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी समाजातील विविध सामाजिक संस्था ,उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते मदत देऊन प्रेरणा देण्याचे काम करत असतात.  

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थित मान्यवरांचा परिचय विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास जगताप सर यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन आणि उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयाचे लिपिक वसिम मणियार यांनी केले.

 

----- Advertisements -----

स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin