यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टर सह असा ही होतो बैलपोळा साजरा
संगमनेर : भारत रेघाटे
प्राणी मात्रावर भूतदया दाखवून त्याच्मा प्रती कृतज्ञा दाखवणे हे मानवाने कर्तव्य होय. मोजक्याच शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित बैल जोड्या आहेत. परंतु यांत्रिकीकरणामुळे बैलाच्या संख्येमध्ये घट झाल्याने बैलपोळाच आता साजरा होणे दुरापास्त झाले आहे. त्या ऐवजी आता ट्रॅक्टर पोळा साजरा होत आहे. परंतु ट्रॅक्टर पोळा सुध्दा ज्याच्या त्याच्या सवडीने साजरा केला जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

झूल, बेगड, बाशिंग, घुंगराच्या मळा, बैलांच्य शिंगाची सजावट करून मिरवणूक काढल्या जाते असे मारुती मंदिरात बैल एकत्र येत असत आता हे चित्र पूर्णतः बदलून गेल्याचे दिसून येत आहे. गावात ज्यांच्या त्याच्या परीने मारूती मंदिरात फेरी मारून बैल पोळा साजरा करताना दिसत आहे. यांत्रिकीकरण आणि शेतीत ट्रॅक्टर आल्यामुळे बैलाचे प्रमाण हे अत्यल्प झाले असून आता बैल हा प्राणीच दुर्मिळ होत चालला आहे. ग्रामीण भागात 500 ते 1000 उंबरठे असलेल्या गावात हजारोच्या संख्येने बैल जोड्या होत्या. परंतु आता गावामध्ये हे प्रमाण शंभरात एक ते दोन जोडी असे प्रमाण असल्याने क्वचित एखादा बैल चारा वाहताना दिसून येतो. पोळ्याच्या दिवशी बैलांना आंघोळ घालून स्वच्छ करून गायी बैलांची सजावट केली जाते. बैलाच्या अंगावर झूल शिंगांना वारणीस तर गळ्यामध्ये रंगीबेरंगी कासरे घंटे बांधून , उंबराचे सावड गोंडे करून बैल गायीच्या गळ्यात बांधतात..मारुती मंदिरात दर्शनासाठी बैलजोडी नेत त्या ठिऊ मंगलाष्टक म्हणत बैल जोडीचे लग्न लावण्याचा प्रकार आणि होत असे.

पहिला मान त्या त्या गावच्या पाटलाला, सरपंचाच्या बैलजोडीला दिल्या जात असे. परंतु आता यांत्रिकी युगामुळे ट्रॅक्टर आल्याने काही ठिकाणी ट्रॅक्टर पोळा ही साजरा केला जातो. परंतु ट्रॅक्टर पोळा हा शेतकरी आपापल्या परीने साजरा सवडीने साजरा करताना दिसून येतो. त्यातच बैलांचे प्रमाण कमी झाल्याने शेतकरी आपापल्या परीने बैल जोडीला मारुती मंदिरा दर्शनासाठी घेऊन जात. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मंदिर ट्रस्टीच्या वतीने सन्मान केला जातो. तर काही गावामध्ये एखाद्या कुटुंबाला सुतक आल्यानंतर त्यांचे भाऊबंद सुद्धा पोळा सण साजरा करत नाहीत. शहरात आणि ग्रामीण भागामध्ये शेतकरी दोन-चार जोड्या घेऊन गावातून मिरवणूक काढून मारुतीचे दर्शन करून बैलपोळा साजरा करताना दिसून येतात. संगमनेर तालुक्यातील रहिमपूर आणि परिसरात बैल आणि ट्रॅक्टर पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्याच्या आतषबाजीत आणि डीजेच्या तालावर तरुण शेतकऱ्यांनी ठेका धरत आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

_असाही साजरा केला जातो बैल पोळा_
महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी "श्रावणी पोळा" तर पश्चिम महाराष्ट्रात भाद्रपदातील "भादवी पोळा" म्हणून साजरा केला जातो. सुनील गुंदेचा म्हणाले की, मी शेतकरी नाही, माझ्या घरी गाय किंवा बैल पण नाही. आवड म्हणून दुसऱ्याच्या गावठी गाईचे पूजन करण्यासाठी गेली पंधरा वर्षापासून सजावटीचे साहित्य घेऊन जातो आणि बैलपोळा साजरा करतो. माणसाने भूतदया जाणली पाहिजे असे गुदेचा म्हणाले.
