युसुफ चौगुलेला तात्काळ हजर करा ; लव्ह जिहाद प्रकरणातील सह आरोपी असलेला चौगुलेचा जामीन रद्द ; संगमनेर सेशन कोर्टाने दिला निर्णय
घारगाव ( प्रतिनिधी )
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या खटल्या पैकी आंबी खालसा येथील खटला होय.


आंबी खालसा येथीण्ल अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेल्याचा, धर्मांतर घडवून आणण्याचा, तसेच तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या लव जिहाद प्रकरणातील सह आरोपी असलेला युसूफ चौगुलेचा अखेर जामीन रद्द करण्यात आला आहे.
या प्रकरणातील युसूफ चौगुलेचा यापूर्वीचा जामीन अर्ज कोर्टाने मंजूर केला होता. मात्र दरम्यान युसूफ चौगुले याकडे मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यात सहा पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळून आल्याने त्यास अटक करण्यात आल्याने तसेच यापूर्वी त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याने आरोप दंडणीय गुन्ह्यासाठी सीआर क्रमांक 157 -2025 आहे
उपरोक्त गुन्हा नोंदला गेला असून शस्त्रासह आरोपी सापडल्याने शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 25 (1) (अ) आणि 27 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. यापूर्वी चौगुलेच्या विरोधात घारगाव पोलीस स्टेशनमध्ये कलम 137, 287, 123, 64, (2) 351 (2 ) 49, 74, 75, 78 ,3 (5) भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत लैंगिग गुन्ह्यापासून मुलाचे संरक्षण कायदा 8 आणि 12 पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
तर मध्यप्रदेशात शस्त्र बाळगल्या प्रकरणी या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील सेशन कोर्टात झालेल्या सुनावणीत न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्या न्यायालयाने युसूफ चौगुलेला तात्काळ हजर करण्याचा निर्णय दिला. या प्रकरणात खासगी वकील के.डी. धुमाळ यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने प्रभावीपणे बाजू मांडली. तसेच सहाय्यक सरकारी वकील श्री दिवाटे यांनी याबाबत भक्कम बाजू मांडली. युसूफ चौघुले यास मध्यप्रदेश मधून बेकायदा शस्त्रांची वाहतूक करताना पकडले गेले. सध्या तो सेंधवा कारागृहात असून मध्यप्रदेश पोलिसांकडून आवश्यक कागदपत्राची पूर्तता करताच युसुफ चौगुले यास संगमनेर न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

