ब्रेकिंग न्यूज :
भारत

योग दिन हा गौरव दिन आहे ;- कानवडे

Blog Image
एकूण दृश्ये: 114

योग दिन हा गौरव दिन आहे ;- कानवडे

 {भारत सरकार ,आयुष मंत्रालयाकडून सिद्धार्थ नाईट हायस्कूल , संगमनेर यांचा प्रशस्तीपत्र देऊन केला सन्मान. }

     संगमनेर : भारत रेघाटे

एकीकडे औषधांची संख्या वाढत आहे. मेडिसीन फूड बनले असून आपल्या सर्वांसाठी ही चिंताजनक बाब असल्याची चिंता योगशिक्षक कैलास कानवडे यांनी व्यक्त केली. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सिद्धार्थ नाईट हायस्कूल ,संगमनेर येथे योग  दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सिद्धार्थ नाईट हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजून सांगत योग प्रात्यक्षिक करून दाखविले. कानवडे म्हणाले की, योगा हा आपल्या देशाचे भूषण आहे. ऋषी मुनींनी आपणास अमूल्य देणगी दिली. त‌क्षशीला विद्यापीठ  जाळून टाकले .यामध्ये अमूल्य ठेव्याची मोठी हानी झाली.

आज 190 देशात योगा करतात. भद्रासन , दंडासन, वज्रासन, धनुरासन, शशांकासन, उष्ट्रासनाने निरोगी जीवन जगता येईल असे योगशिक्ष कानवडे म्हणाले. जेवणानंतर पचनक्रिया वाढते. योगा केल्याने माणसाला आजारच होणार नाही असे ते म्हणाले.

----- Advertisements -----

उष्ट्रासनाने माणूस शारीरिक मानसिक फीट होतो .शशांकासन असे अनेक प्रकार करून दाखवले. श्वास गती वाढवा आयुष्य वाढेल उत्तानमडुकासन भूक वाढवण्यासाठी अग्नी प्रदीप्त  मकरासन अर्धभूजंगासन पूर्णभूजंगासन 15 सेकंद करा पाठ दुखी पळून जाईल असे ते म्हणाले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विकास जगताप, वसीम मणियार, बोर्डिंगचे अधीक्षक अमोल रोकडे , पालक, विद्यार्थी , शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत योगाचे विविध प्रात्यक्षिके घेण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने भारत सरकारच्या आयुष मंत्रालया द्वारा सिद्धार्थ नाईट हायस्कूल यांना प्रशस्तीपत्रक सन्मानपूर्वक देण्यात आले. 

----- Advertisements -----

स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.

संत एकनाथ