ब्रेकिंग न्यूज :
भारत

वंदे मातरम् : स्वातंत्र्य लढ्याची क्रांती ज्योत – डॉ. खेडलेकर

Blog Image
एकूण दृश्ये: 26

वंदे मातरम् : स्वातंत्र्य लढ्याची क्रांती ज्योत – डॉ. खेडलेकर  हैदराबाद राष्ट्रपती भवनात  देशभरातील साहित्यिक, कलावंत संशोधकांचे चर्चा सत्र }

     संगमनेर : ( प्रतिनिधी )

वंदे मातरम् हे केवळ घोषवाक्य नव्हते तर स्वातंत्र्य संग्रामातील स्फुल्लिंग चेतवणारी क्रांती ज्योत असल्याचे स्पष्ट मत डॉ. संतोष खेडलेकर यांनी हैदराबाद येथील राष्ट्रपती भवनात‘वंदे मातरमचा देशाच्या पश्चिम प्रांतावर प्रभाव’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात आपले विचार व्यक्त केले.

       केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालय आणि साहित्य अकादमी यांच्या वतीने आयोजित भारतीय कला महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर देशभरातील साहित्यिक, कलावंत आणि संशोधकांनी विविध विषयांवर मांडणी केली.

  संगमनेर येथील बाल देशभक्त शिरीषकुमार, लक्ष्मण अनंत देशपांडे या दोन्ही युवकांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचा संदर्भ देत, त्याकाळी वंदे मातरम् हे घोषवाक्य नसून प्रेरणेचे स्रोत होते. डॉ. खेडलेकर यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य लढ्यातील दोन बाल देशभक्तांची आठवण करून देत इतिहासातील प्रेरणा जागृत केली. मराठी साहित्य, कविता आणि वंदे मातरम् चित्रपटातील गीतांचा उल्लेख करताना खेडलेकर म्हणाले की, "वंदे मातरम्" हे वेद मंत्राहून वंद्य आहे. असे ज्येष्ठ कवी गदिमा यांनी आपल्या गीतातून व्यक्त केले होते. या उदाहरणातून वंदे मातरम् ने मराठी समाजाच्या मनात असलेले स्थान समोर आले. याच विषयावर गुजरातचे ज्येष्ठ साहित्यिक हरद्वार गोस्वामी यांनीही स्वतंत्र मांडणी केली. दोन्ही विद्वानांच्या मतप्रदर्शनातून वंदे मातरमचा सांस्कृतिक आणि मानसिक प्रभाव या चर्चासत्राचे केंद्रबिंदू ठरले.

कला महोत्सवात देशव्यापी सहभाग 

सुमारे आठ दिवस चाललेल्या या महोत्सवात देशभरातून लोककलाकार, कवी आणि साहित्यिकांनी सहभाग घेतला. विविध कला प्रकारांचे सादरीकरण, चर्चासत्रे आणि विचारमंच आयोजनातून भारतीय संस्कृतीची विविधता अधोरेखित झाली.

----- Advertisements -----

स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.

महात्मा गांधी