ब्रेकिंग न्यूज :
भारत

वैतागलेले नागरिक म्हणाले देव करो ! आमदारांनी हाती घेतलेले काम पूर्ण करो !

Blog Image
एकूण दृश्ये: 309

वैतागलेले नागरिक म्हणाले देव करो ! आमदारांनी हाती घेतलेले काम पूर्ण करो 

         संगमनेर भारत रेघाटे

गेल्या अनेक वर्षापासून गावातील नागरिक सातबारा उताऱ्यावरील एका व्यक्तीच्या नावामुळे ५० ६० वर्षापासून असलेल्या त्रासाला खूप कंटाळलेली आहे. पण स्थानिक लोकप्रतिनिधींनी यावर पाठपुरवठा केल्यामुळे एका नगर वासियांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. संजय लखमीचंद  मुलंची यांच्यासह एकूणच नगरवासीय आता म्हणत आहेत की, देव करो ! आमदारांनी हाती घेतलेले काम पूर्ण करो ! अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षापासून या भागातील नागरिक सातबारा उताऱ्यावरील नावामुळे या त्रासाला खूप कंटाळलेली आहे पण स्थानिक लोकप्रतिनिधींनी यावर पाठपुरवठा केल्यामुळे आमच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.

सातबारा नावावर व्हावा :- गायकवाड  इंदिरानगर मधील सातबारा हा लवकर आमच्या नावावर व्हावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आवाज उठवत आहे त्यामुळे समाधान वाटत असल्याची भावना संगीता गायकवाड यांनी व्यक्त केली. 

आमचे घर आमच्या नावावर होणार :- भागवत खूप वर्षानंतर आम्हा युवकांना आमचा सातबारा आमच्या नावावर होणार आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. हा आशेचा किरण गेल्या अनेक वर्षांपासून दिसतोय तो लवकर पूर्ण होवो असे अक्षय भागवत हा युवा रहिवासी म्हणाला.

दोन्ही आमदारांचे अभिनंदन :- कानकाटे.                               शिवसेना शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवींद्र कानकाटे म्हणतात  माझ्याही जन्माच्याही आधीपासून म्हणजे तब्बल ५० ते ६० वर्षापासून इंदिरानगर मध्ये पालिकेचे आरक्षण आहे. तसेच मनियार या व्यक्तींचे नाव त्यावर आहे. यामुळे बऱ्याच अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता यातून आमची सुटका होईल असा आशावाद वाटतो. याकामी आमदार सत्यजित तांबे. आणि आमदार अमोल खताळ या दोघांनी हाती घेतलेले काम तसेच सातत्याने महसूल मंत्री यांची भेट घेऊन या संदर्भात सातबारा रहवाशींच्या नावे व्हावे यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच फलद्रूप होतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे रवींद्र नंदू कानकाटे यांनी दिली.

गेली काही दिवसापासून संगमनेर मध्ये एक आनंदाची वार्ता पसरली आहे. ती म्हणजे इंदिरानगरच्या 700 कष्टकऱ्यांचे होणार  स्वप्नांचे सार्थक होणार असून घराचे हक्क येथील रहिवाशांना मिळणार आहेत यासाठी महसूल मंत्री बावनकुळें यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याचे समजते याकामी आमदार सत्यजीत तांबेंचे यांचे प्रयत्न सफल ठरत आहेत. त्यांनी केलेल्या वेळोवेळी पाठपुरावा तसेच भेटीगाठी यातून हा मार्ग लवकरच मार्गी लागेल.

----- Advertisements -----

शहराच्या अत्यंत मध्यभागी असलेला भाग म्हणून इंदिरानगर मधील 700 कष्टकरी घरमालकांना आमदार तांबे यांच्या प्रयत्नांतून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विवादित जमिनीवरील पोकळीस्त नोंदी रद्द करून, प्रत्यक्ष कब्जाधारक घरमालकांच्या नावे जमिनीचे हक्क देण्याचा निर्णय जाहीर केल्याने या विवादावर अखेर पडदा पडून इंदिरानगर मधील कष्टकऱ्यांमध्ये आनंदाचे वार्ता पसरली.

इंदिरानगर मधील जवळपास 700 गरीब कुटुंबांनी 40 - 50 वर्षांपूर्वी एक-अर्धा गुंटा जमीन कष्टाच्या पैशातून विकत घेऊन घरे बांधली, मात्र महसूल नोंदीत असंख्य परिवाराची नावे अडकलेली होती. घरमालक नियमित कर भरत असूनही मालकी हक्कासाठी लढत होते.

शहराच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे  यांनीही या प्रकरणासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला सत्यजीत तांबे यांनी अनेक वर्षांपासून ही समस्या मनावर घेत अखेर ती तडीस लावली. दुर्गा तांबे यांनी स्थानिक स्तरावर प्रचंड प्रयत्न करून रहिवाशांना एकत्र केले होते. त्यांच्या या संघर्षाला अखेर मुहूर्त लाभला असून शासन मान्यताच मिळाल्याने यश लाभले आहे. इंदिरानगरच्या प्रत्येक कष्टकरी कुटुंबाचा हा विजय आहे. आज शासनाने गरीबांच्या बाजूने उभे राहून ऐतिहासिक न्याय आपल्याच बाजुने लागणार असल्याची प्रतिक्रिया दुर्गा तांबे यांनी दिली.

इंदिरा नगर वासियांच्या बाजूने निर्णय झाला.:- आमदार सत्यजीत तांबे ;  सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखालील प्रयत्नांचा पाठपुरावा: ११ जुलै २०२५: सत्यजीत तांबे यांनी महसूल मंत्र्यांना लेखी निवेदन सादर करून इंदिरानगर मधील नागरिकांच्या भूमीच्या मालकी हक्काच्या प्रक्रियेला प्राधान्य द्यावे. १४ जुलै २०२५: मंत्री महोदयांना प्रत्यक्ष भेट देऊन प्रकरणाची तातडीने निकाल लागावेत यासाठी आग्रह धरला. ३० जुलै २०२५: आजच्या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इंदिरा नगर वासियांच्या बाजूने निर्णय झाला.

महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली 30 जुलै आणि त्यानंतर ही मसू विभागाशी भेट होऊ न संगमनेर शहरातील इंदिरानगर भागातील सर्वे नं. 106 (442) येथील नागरिकांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी, तसेच महसूल अभिलेखातील पोकळीस्त व अन्य हक्कांच्या नोंदी रद्द करून प्रत्यक्ष रहिवाशांच्या नावावर 7/12 व सिटी सर्वे अभिलेख करण्यासंदर्भात बैठक पार पडली. या अनुषंगाने 1 ऑगस्ट 2025 रोजी संगमनेर बुद्रुक येथील सर्वे नं. 106 (442) प्रमाणेच सर्वे नं. 104, 105 व 219 मधील पोकळी स्थळ व इतर हक्कांच्या नोंदी रद्द करून, प्रत्यक्ष वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या नावावर नोंद करण्याचे आदेश अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावेत, अशी विनंती पत्राद्वारे केली होती व आज पुन्हा महसूल मंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा झाली. यावर मंत्री महोदयांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक निर्देश दिले, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभारही तांबे यांनी व्यक्त केले.

----- Advertisements -----

आमदार अमोल खताळ म्हणाले आपण गोरगरीबांच्या हक्कासाठी नेहमीच तत्पर :-                                      शहर आणि तालुक्यातील विविध समस्या साठी आपण त्या त्या संदर्भातील मंत्री महोदया बरोबर भेटी आणि संपर्कात आहोत. संगमनेर शहरा सह तालुक्यातील आरक्षित आणि पोकळीस्त जागेच्या संदर्भात महसूलमंत्र्यांची भेट घेत तत्काळ बैठकही झाली.

अधिकार्‍यांची बैठक आणि ठोस निर्णयाची तयारीला आता वेग आला असून संगमनेरमधील इंदिरा नगरसह गुंजाळवाडी, कासारा दुमाला, समनापूर, राजापूर व अन्य भागांतील अनेक शेतकरी व गोरगरीब नागरिक गेल्या ५० ते ६० वर्षांपासून एका गंभीर अन्यायाला सामोरे जात होते. त्यांच्या जमिनी, घरांच्या जागा, शेतजमीन आणि राहत्या मिळकतींवर "पोकळीस्त" व "इतरं हक्कांतील कब्जेदार" म्हणून अनधिकृत नोंदी करण्यात आल्या होत्या. या नोंदींमुळे संबंधित नागरिकांना बँक कर्ज, शिक्षण प्रमाणपत्र, कायदेशीर व्यवहार, पाणी-जोडणी, घरपट्टी, नळपट्टीसह सर्व नागरी सुविधांपासून वंचित राहावं लागत होतं. तसेच, शेतजमिनीच्या नोंदी न झाल्यामुळे काही परिवारात देखील वाद होत होते. तर काहींना तर धमक्याही दिल्या जात होत्या या विरोधात संबंधित नागरिक यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे निवेदने सादर केली. याची तात्काळ दखल घेत, आ. खताळ यांनी महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना विविध निवेदनांद्वारे समस्या सविस्तर मांडली असून संबंधित नोंदी रद्द करून ताबेदारांना न्याय मिळावा यासाठी सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे खताळ यांनी सांगितले.

 

स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.

महात्मा गांधी