विषारी द्रव्य आढळून आल्याने एकाचा मृत्यू ; दुसऱ्या मृतदेहाचे गूढ कायम ? लवनवस्तीत दोन मृतदेह आढळले; पतीचा घरात, तर पत्नीचा शेततळ्यात; घटनेने संगमनेर राहाता तालुक्यात उडाली खळबळ ;मृत्यूचे कारण अस्पष्ट
संगमनेर { प्रतिनिधी }
तहसील मध्ये ग्रामीण भाग असलेल्या सादतपूर शिवारात एक विचित्र घटना समोर आली असून या घटनेत दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीचा मृतदेह घरात तर पत्नीचा मृतदेह शेततळ्यात आढळला असून सदरचा प्रकार घातपात आहे की, आत्महत्या आहे ? याबाबत नेमके कारण समजले नसून या घटनेने संगमनेर राहाता तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सादतपूर शिवारात दोन् मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आली असून पती रेवजी मुरलीधर गायकर तर पत्नी नंदा रेवजी गायकर अशी मृत पावले्ल्याची नावे आहेत.

निमगाव जाळी येथील त्यांच्या मुलीने सकाळपासून आई-वडिलांना बऱेच फोन केले पण उत्तर मिळाले नाही. तिने चुलत भाऊ चेतन गायकर ( वय ३६ ) गोगलगाव, राहाता) यांस फोन केला. तो यांच्या घरी गेला असता त्यावेळी चुलते रेवजी गायकर हे घरात मृतावस्थेत आढळून आले. चुलती नंदा या घरात दिसल्या नाहीत. शोध घेतला असता घराशेजारील शेततळ्यात त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला. चेतन गायकर यांनी स्थानिक नागरिकांसह पोलिसांना या घटनेची माहिती कळवली.

आश्वी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गोगलगावात अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात पती रेवजी यांच्या शरीरात विषारी द्रव्य आढळून आल्याचे समजते त्यांचा व्हिसेरा राखून ठेवला असून पत्नी नंदा यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे समजू शकले नाही. त्यांच्या मृत्यूचे गूढ मात्र असप्ष्ट आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असून विशाल हा छत्रपती संभाजीनगर मध्ये नोकरीस आहे तर मोठी मुलगी मंगल ही पंचायत समिती संगमनेर येथे कार्यरत आहे. तर दुसरी मुलगी सोनाली लोणी प्रवरा मेडिकल ट्रस्ट येथे कार्यरत आहेत. आश्वीचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास आर डी पारधी करीत आहेत

