वीरजवान संदीप घोडेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार ; अंतिम यात्रेने संगमनेरकर झाले भावूक ; सीआरपीएफ ,शहर पोलीसांनी दिली मानवंदना ; साश्रुनयनांनी दिला अखेरचा निरोप
संगमनेर प्रतिनिधी
शहरातील घोडेकर मळ्यात वास्तव्यास असलेले तालुक्याचे सुपुत्र सीआरपीएफ वीरजवान संदीप किसन घोडेकर वय ३७ दिल्ली येथे देशसेवा बजावत असताना शहीद झाले. त्यांच्यावर बुधवार दिनांक 16 रोजी सकाळी 11 वाजता अत्यंत शोकपूर्ण वातावरणात शासकीय इतनामात प्रवरा तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सीआरपीएफ, शहर पोलिसांच्या वतीने त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.

देशाची सेवा करण्यासाठी २००७ मध्ये संदीप रुजू झाले. १८ वर्ष त्यांनी देशाची सेवा केली. या सेवेमध्ये मुंबई, दिल्ली सांसद भवन, पहेलगाम, छत्तीसगड, भारत पाकिस्तान सीमेवर त्यांनी देशाची सेवा केली.

तत्पूर्वी १२ शिकले परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. काही महिने मालपाणी इंडस्ट्री मध्ये संदीप घोडेकर यांनी कामगार म्हणून कामही केले. काळाने वेळेच्या आधीच घातला, हृदयविकाराचा तीव्र झटक्याने संदिप घोडेकर शहिद झाले. यांच्या जाण्याने संपूर्ण तालुक्यात शोक कळापसरली आहे. आठ दिवसापूर्वी कुटुंबीयांना दिलेली भेटही अखेरची ठरली.

शहरातून काढली अंतिम यात्रा
मंगळवार दि. १५ ला पहाटे हृदय विकाराचा तीव्र झटक्याने ते शहीद झाले. त्यांचा पार्थिव देह दिल्लीवरून पुण्याला आणि पुण्यावरून संगमनेर येथे आणण्यात आला. अंतिम दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आला होता. जवान संदीप घोडेकर यांची अंतिम यात्रा अकोले नाका, रु. दा. मालपाणी विद्यालय, मेन रोड, दिल्ली नाका मार्गे काढण्यात आली. सूर्या अकॅडमी आणि जय हिंद अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध या अंतयात्रेमध्ये मोलाचे योगदान दिले. शहीद जवानांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी संगमनेर शहर बंद ठेवण्यात आले होते. अत्यंत भावूक होत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी अंतिम दर्शन घेतले.

यांची होती उपस्थिती
तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपाधीक्षक डॉ, कुणाल सोनवणे ,पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख पालिका मुख्याधिकारी रामदास कोकरे, इंद्रजीत थोरात ,नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ. मैथिली तांबे, नीलम खताळ , भाजपाचे ज्ञानेश्वर कर्पे स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोटकर, लक्ष्मण ढोले, रायभान पवार, संदीप गुंजाळ , जगन्नाथ खामकर, कॅप्टन भिकाजी भागवत, रामदास कडलग, संजय राहणे, सुनील थोरात, अर्जुन कोल्हे, आजी-माजी सैनिका सह महसूल विभागाचे पदाधिकारी, कर्मचारी, तलाठी, उद्योजक शाम कर्पे, गोपाल पडताणी, सोमेश्वर दिवटे, नरेश माळवे, राहुल भोईर, शशांक नामन, शिवसेना तालुका माजी अध्यक्ष रमेश काळे, योगेश बिचकर, भगवान घोडेकर, प्रशांत वाडेकर, योगेश सूर्यवंशी, यांच्यासह घोडेकर मळा तसेच संगमनेरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांनी व्यक्त केल्या भावना
पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, , डॉ, मैथिली तांबे, भाजपाचे ज्ञानेश्वर कर्पे, नवनाथ अरगडे, प्रकाश कोटकर, लक्ष्मण ढोले, राहूल भोईर ,शासकीय तसेच प्रतिष्ठित नागरिक यांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.

मुस्लिम बांधवांनी मेजर घोडेकर यांना वाहिली श्रद्धांजली सीआरपीएफ जवान संदीप घोडेकर यांच्या जानाने संगमनेर शहरासह तालुक्यात शोक काळा पसरले. या घटनेने मुस्लिम समुदायाने तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली ही वाहिली.

मेजर घोडेकर यांच्या रूपाने देशभक्त हरपला -आ खताळ
मेजर संदीप घोडेकर यांच्या जाण्याने संपूर्ण संगमनेर गावावर शोककाळा पसरली आहे त्यांनी सीआर पीएफ जवान म्हणून जम्मू व काश्मीर छत्तीसगड दिल्ली येथे अत्यंत उत्कृष्ट सेवा केली आहे. कर्तव्यावर असताना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ही बातमी समजतात खूप वाईट वाटले. परंतु मी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना निमित्त मुंबईत असल्यामुळे अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहू शकलो नाही . याची मला खंत आहे. त्यांच्या अकाली निधनाने संगमनेरची फार मोठी हानी झाली असून ती कधीच भरून निघणार नाही.
नीलम खताळ म्हणाल्या की, मेजर घोडेकर परिवाराच्या दुःखात खताळ परिवार सहभागी असल्याचे सांगत त्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यांच्या कार्याचा आम्हाला सदैव अभिमान आहे. त्यांच्या अकाली निधनाने घोडेकर कुटुंबीय आणि परिवारावर जो दुःखाचा फार मोठा डोंगर कोसळला आहे. खताळ परिवार त्यांच्या दु:खात सहभागी आहे. यातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो अशी प्रार्थना करते.
