ब्रेकिंग न्यूज :
भारत

वीरजवान फौजी संदीप घोडेकर शहीद ;

Blog Image
एकूण दृश्ये: 472

वीरजवान फौजी संदीप घोडेकर शहीद ; उद्या शासकीय इतमामात होणार अंतिम संस्कार; आठ दिवसापूर्वीच दिलेली भेट ठरली अखेरची 

     संगमनेर { भारत रेघाटे }

शहरातील घोडेकर मळ्यातील रहिवासी तसेच तालुक्याचे सुपुत्र वीरजवान फौजी संदीप किसन घोडेकर वय ३७ हे दिल्ली येथे देशसेवा बजावत असताना शहीद झाले. 

घोडेकर कुटुंबीयांची असलेल्या अत्यंत नाजूक परिस्थितीही संदीप सेनादलात रूजू झाले.परिस्थितीमुळे १२ वीं पर्यंत त्यांचे शिक्षण झाले काही महिने मालपाणी इंडस्ट्री मध्ये संदीप यांनी कामगार म्हणून कामही केले होते. परंतु त्यांना देशसेवा करण्याची ऊर्मी शांत बसू देत नव्हती. सैन्यदलात ते भर्ती झाले. १८ वर्ष देशाची सेवा केली. या सेवेमध्ये मुंबई, दिल्ली सांसद भवन, पहेलगाम आणि भारत पाकिस्तान सीमेवर त्यांनी या देशसेवा केली.

 काळाने त्यांच्यावर वेळेच्या आधीच घाला घालीत त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने संदिप घोडेकर शहिद झाले. मुलगा यश इयत्ता सातवीत असून पत्नी वर्षा गृहिणी आहे. बुधवार दि १६ सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर संगमनेर येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. अत्यंत शांत सुस्वभावी असलेले संदीप यांच्या जाण्याने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

----- Advertisements -----

आठ दिवसांपूर्वीची भेट ठरली अखेरची   -                               घोडेकर कुटुंबाची परिस्थिती तशी अत्यंत हलाखीची. आई परिघा, वडील किसन हे दोघेही मालपाणी कंपनीत काम करत मुलांना शिकवले. दरम्यान पाच वर्षांपूर्वीच वडिलांचे निधन झाले. आई सुद्धा रिटायर झाली. भाऊ गणेश मालपाणी कंपनीत कार्यरत आहे. 10 जूनला संदीप यांनी आपला 37 वा वाढदिवस मोजक्या मित्राबरोबर साजरा केला.आठ दिवसांपूर्वीच संदीप संगमनेर येथे आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठीही आले होते. घरातील सर्व कुटुंब सदस्यांना मन भरून बघितले. लाडक्या कार्तिकच्या डोक्यावरून हात फिरवत मुलगाही जीवनात यश संपादन करेल असा क्षण त्यांंनी आपल्या डोक्यात साठवला. यावेळी जातांना ते खूपच भावूक झालेले दिसून आले. आठच दिवसापूर्वी दिलेली भेट ही शेवटची ठरेल असे स्वप्नातही आले नाही.

श्रमाशिवाय फळ मिळत नाही.

लोकमान्य टिळक