वीज वितरणानाला आधीच सेवेची हौस, त्यात पडला पाऊस : ऑक्टोबर हिटचा वाढला चटका; ग्राहकाला बसतोय फटका ; वीज वितरणाला कधीही येतोय झटका ; लपंनडावाचा लावला धडाका ; ऐन दिवाळीत नागरिक त्रस्त; वीजेची होते स्पार्किंग, बँकां करतात अंधारात वर्किंग ; बँक कर्मचारी, नागरिकांचाही तीव्र संताप ; संप संपला नाही का ? नागरिकाचा संतापजनक सवाल
संगमनेर ( भारत रेघाटे )
वीज वितरण कंपनीच्या नेहमीच्याच ढिसाळ नियोजना बद्दल तसेच त्यांच्या अनागोंदी कारभाराबद्दल अनेकदा टीकेची झोंड उठवल्या जाते. हो ! हे अगदी तितकेच खरे आहे. तसा अनुभवही आता शहरावाशीयांबरोबर उपनगरात, छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी, नागरिकांनी ऐन दिवाळीत वीजेचा लपंडाव अनुभवला आहे. दिवाळीच्या प्रत्येक पर्वाला वितरणाच्या या लपंडावाला नागरिकांना सामोरे जावे लागल्याने वीज वितरण कंपनीवर सर्वच स्तरातून ताशेरे ओढले जात आहेत.

ऐन दिवाळीतही प्रत्येक पर्वाच्या काळात शहरात ब-याच भागात, ठीक ठिकाणी, उपनगरातही विजेचा लपंडाव सातत्याने दिसून आला. विशेषतः दुपारच्या वेळेत बँकेत व्यवहार करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना तोंड द्यावे लागले. बँकेत झालेली गर्दी दुसरीकडे विजेचा खोळंब्यापुढे ग्राहकांना खोळंबून राहण्याची वेळ आल्याने मोबाईल स्टार्च मध्ये काम करतांना दिसून आले. बँक कर्मचारी , अधिकारी आणि ग्राहकांनी वीज वितरणाला अचानक आलेल्या झटक्याबदल चांगला रोष व्यक्त केला आहे.

दिवाळी सणासुदीच्या काळात 'रोशनी' देण्याऐवजी वीज वितरणाच्या या लपंडावाचा 'शनी' चांगलाच मागे लागला असल्याचे दिसून येत आहे. रात्रीसह आता दिवसाही लपंडाव सुरू असलृयाने नागरिक मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत. आकाशात वीज कडकडत असेल तर निश्चितच विजेचा खेळखंडोबा आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण नेहमीच रात्रीस खेळ चाले असे ब-याचदा ऐकले परंतु दिवसाढवळ्या ही वीजवितरणाचे झटके आता आपल्याला पहावयास मिळत आहेत. दिवाळ सणात तर असा एकही दिवस विजेच्या लपंडावाशिवाय गेला नाही. एकीकडे ऑक्टोबर हिटच्या उकाड्याने चांगलाच चटका बसत असून दुसरीकडे मात्र विजेच्या लपंडावाचा तडाका हा संगमनेर मध्ये सातत्याने सुरू असल्याने नागरिक मात्र हैराण झालेले दिसून येत आहेत. तर बीलासाठी मात्र वीज वितरणाला ग्राहकाकडून वसुली करण्यासाठी रान चांगलेच मोकळे पडले आहे.

अजून संप संपला नाही का ?
दरम्यान वीज वितरण कंपनीने खासगीकरणाच्या विरोधात आवाज उठवत तब्बल तीन दिवसाचा संप पुकारला होता. बैठक होऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा संप तात्पुरता मागे घेण्यात आला. वीज वितरण कर्मचा-यांच्या मागण्या मान्य करू असे आश्वासन दिल्याने संप तात्पुरता स्थगीत केला असला तरी वीज वितरणा करण्यासाठी वितरण कंपनीला गती मात्र मिळालीच नाही.

टर उडवत ग्राहकाच्या माथी लादले जातय स्मार्ट मीटर
--- वीज वितरण कंपनी स्मार्ट मीटर बाबत मनमानी करीत असून ,नागरिक घरी नसताना तसेच काहींच्या दाराला कुलूप असतानाही वीज वितरण ठेकेदाराकडून कोणतीही विचारपूस न करता जुने मीटर बेधडक काढून भिंतीवर धडकवले जाते. जणू हा "पठाणी दम" भरत "स्मार्ट मीटर" ग्राहकाच्या माथी लादले जात आहे. वीज वितरण कंपनी ही 'ग्राहक दे वो भव' च्या नावाखाली सर्रासपणे मनमानी कारभार करीत असल्याचे दिसून येत आहे.
