ब्रेकिंग न्यूज :
भारत

वीज वितरणाचे कर्मचारी तीन दिवस राज्यव्यापी संपावर ; कार्यालयात सुकसुकाट ; कर्मचाऱ्यांनी दाखवली एकजूट

Blog Image
एकूण दृश्ये: 39

वीज वितरणाचे कर्मचारी तीन दिवस राज्यव्यापी संपावर ; कार्यालयात सुकसुकाट ; कर्मचाऱ्यांनी दाखवली एकजूट

    संगमनेर : भारत रेघाटे

रात्री बारा वाजल्यापासून महावितरण, महानिर्मिती महापारेषण या तीन्ही कंपनीचे लाख कर्मचारी ७२ तासाच्या राज्यव्यापी संपावर गेल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यात सर्वत्र अंधार पसरेल का ? ऐन दिवाळीत कर्मचारी संपावर गेल्याने वीज वितरणाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. सरकारला या विषयाचे गांभीर्य नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांनी सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या. सरकारच्या या आंधळ्या कारभारावर वीज वितरण कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी रोष व्यक्त केला.

अनेक नागरिक वीज बील भरणा करण्यासाठी वीज वितरण कंपनीत गेले असता त्यांना कार्यालयात सुकसुकाट दिसल्याने भरणा न करताच विनमूख परत यावे लागले. एकूणच संपाबाबत नागरिकाला कोणतीही कल्पना नसल्याचे यातून दिसून आले.

          खऱ्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरून आयटीआयच्या विद्यार्थ्यांकडून काम करून घेण्याची सरकारची मनमानी चालू देणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. खासगीकरणा बाबत सरकारचा विचार हा दंडेलशाही, हुकूमशाही आणि मोठ्या उद्योगपतींना बडे करण्याचा घाट सरकार घालत आहे. याबद्दल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी सरकारच्या निर्णयाबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

----- Advertisements -----

      एवढेच नव्हे तर सरकारच्या वतीने हा संपच बेकायदेशीर ठरवत मेस्मा लागू करण्यात आला. महावितरण अभियंता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व रजा रद्द केल्या असून सर्व कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर राहण्याचे आदेश देण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आयटीआय विद्यार्थ्यांची मदत घेत वीज पुरवठा सुरळीत करून प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रूम तयार तयार करून परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. या संपात कर्मचाऱ्यांच्या वाटाघाटी निष्पन्न न झाल्याने या संपात बहुसंख्य कामगार सहभागी झाले असून संगमनेर शहर तालुक्यातील अनेक कर्मचारी जिल्ह्याच्या ठिकाणी संपा सहभागी झाले.

     या संपात ८५ हजार कर्मचाऱ्यां बरोबर ४० हजार पेक्षा जास्त कंत्राटी कामगार संपावर गेले असल्याने वीज वितरणाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.

 

----- Advertisements -----

संपत्तीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे.

शिवाजी महाराज