विहिंपच्या पूनम गांधी यांचे अपघातात निधन ; मरणोत्तर केले नेत्रदान
श्रीरामपूर (प्रतिनिधी )
विश्व हिंदू परिषदेच्या विहिंप जिल्हा बाल संस्कार प्रमुख तथा समाज प्रबोधन कार्यकर्त्या पूनम सुहास गांधी (वय ४२) यांचे मंगळवार दि २७ मे रोजी ओव्हरब्रिजजवळ झालेल्या अपघातामुळे निधन झाले.
अपघाता नंतर त्यांना अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटलयात दाखल करण्यात आले होते, परंतु संध्याकाळी ६ वाजता उपचार चालू असतानाच देहावसान झाले. श्रीरामपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाला.

*_सामाजिक कार्यात अमूल्य योगदान:_*
पूनम गांधी या वडाळा महादेव येथील अजितदादा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये योग शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. विहिंप मधील संघटनात्मक कामांसाठी त्यांनी श्रीरामपूर, बेलापूर येथे मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकवाचे मोठे कार्यक्रम आयोजित केले होते, ज्यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. नुकताच श्रीरामपूरमध्ये बाल संस्कार वर्ग सुरू केला होता. संघटनेच्या कामाचा विस्तार व्हावा, ही त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांच्या निधनामुळे संघटनेची अपूरणीय क्षती झाली आहे. मरणोत्तर त्याचे नेत्रदान करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती सुहास गांधी, सिया, नक्ष, सासू, दीर, पुतणे असा मोठा परिवार आहे.

