ब्रेकिंग न्यूज :
भारत

'व्हीओएम' अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी गडाख यांची निर्विरोध निवड

Blog Image
एकूण दृश्ये: 178

"व्हीओएमअहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षपदी गडाख यांची निर्विरोध निवड

      संगमनेर भारत रेघाटे

पत्रकारांची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या 'व्हाईस ऑफ मीडिया'.        { VOM } या संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब गडाख यांची निर्विरोध निवड करण्यात आली.

संघटनेचे राज्याचे वरिष्ठ पदाधिकारी आणि माजी जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, राज्य पदाधिकारी आणि जिल्ह्याचे माजी सचिव अमोल मतकर यांच्या मार्गदर्शना खाली सर्व जिल्हा कार्यकारिणी आणि सदस्यांच्या बहुमताने  झालेल्या बैठकीत 'सी न्यूज' चॅनेलचे संचालक बाळासाहेब गडाख यांची एकदिलाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

----- Advertisements -----

त्यांच्या निवडीबद्दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले,  राज्य कोअर कमिटीचे पदाधिकारी गोरक्षनाथ मदने, कोअर कमिटी विंग प्रमुख अमोल मतकर आदिंनी गडाख यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

व्हॉइस ऑफ मीडिया च्या वतीने संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, अमळनेर येथील संघटेचे राज्याचे प्रदेश सरचिटणीस डॉ. दिगंबर महाले, तालुका अध्यक्ष उमेश काटे यांच्या नेतृत्वाखाली अमळनेरचे येथील सर्व पत्रकार मित्रांच्या सहकार्याने पत्रकारांसाठी 13 - 14 सप्टेंबर ला दोन दिवसांचा "केडर कॅम्प" संपन्न झाला. अमळनेर येथील 'मंगळग्रह' या ठिकाणी झालेल्या 'केडर कॅम्प' ला उभ्या महाराष्ट्रातून आलेल्या पत्रकार बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला. पत्रकारांच्या जीवनात बदल करणारा एक अद्भुत असा केडर कॅम्प अमळनेर येथे घेण्यात आला.‌

निवडी बद्दल नूतन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख म्हणाले की, संघटनेच्या पंचसूत्रीनुसार आपण सर्वजण मिळून काम करणार आहोत. आपल्या सर्वांचा आभारी आहे, इथे मी एकटा पदाधिकारी नसून आपण सर्वजण पदाधिकारी आहात. याच भावनेने आपण सर्वजण मिळून आपला जिल्हा सक्षम बनवू तसेच संघटनेची बांधणी मजबूत करण्यासाठी सचोटीने प्रयत्न करू. लवकरच संघटनेच्या वतीने जिल्ह्यात विभागीय बैठका घेऊन 22 नोव्हेंबर 2025 ला पंढरपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाची तयारी करणार असल्याचे गडाख यांनी सांगितले.

----- Advertisements -----

बाळासाहेब गडाख यांच्या निवडीबद्दल 'नवरदेव' चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक निरंजन देशमुख, रेणुका ओनियन हेअर ऑईलचे उद्योजक संजय साबळे यांनी त्यांचे कौतूक करत शुभेच्छा दिल्या. गडाख यांंचेवर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

श्रम हेच यशाचे खरे साधन आहे.

लोकमान्य टिळक