ब्रेकिंग न्यूज :
भारत

ऊर्जादायी सूर्यकिरणांत उमटली एकतेची पावले ;

Blog Image
एकूण दृश्ये: 19

ऊर्जादायी सूर्यकिरणांत उमटली एकतेची पावले ; रन फॉर युनिटी’मध्ये खाकी वर्दी,नागरिक, विद्यार्थीही तालात दौडले

     संगमनेर : भारत रेघाटे

       पहाटेच्या कोवळ्या सूर्यकिरणांत एक नवा जोम, एक नवीन उमेद घेऊन शेकडो पावले राम पाहऱ्यात संगमनेरच्या रस्त्यांवर गतिमान झाली. ‘राष्ट्रीय एकता दिना’च्या औचित्याने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड स्पर्धा’ रन फॉर युनिटी चे आयोजन करण्यात आले होते.


   भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या अखंडतेसाठी दिलेलं योगदान प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन देशाची एकता व अखंडता टिकवण्याचा संदेश या दौडीतून देण्यात आल्याने एकतेची दौड संगमनेरकरांच्या मनात देश भक्तीची ज्योत प्रज्वलित करून गेली.

      आमदार अमोल खताळांचा प्रेरणादायी संदेश ; एकता दौडीचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे, भाजप तालुकाध्यक्षा पायल ताजणे, तसेच विविध मान्यवर, पोलीस अधिकारी, कर्मचारी ,नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        स्वातंत्र्यानंतर खरी एकात्मता जपण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं. जुनागढ, काश्मीर आणि हैदराबादच्या विलिनीकरणाच्या वेळी त्यांनी दाखवलेली कणखर भूमिका देशाच्या इतिहासात अमर झाली. त्यांचा त्याग, शिस्त आणि देशभक्तीचा आदर्श प्रत्येक भारतीयाने आपल्या जीवनातून घ्यावा. तसेच, पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवक-युवतींच्या सहभागाचे कौतुक करत त्यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन आमदार अमोल खताळ यांनी केले तसेच त्यांच्या भावी कारकिर्दीस शुभेच्छाही दिल्या. पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे म्हणाले की, या एकता दौड स्पर्धेमागचा मुख्य उद्देश म्हणजे भारताच्या अखंडतेचा आणि एकतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे.हा आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी स्पर्धेच्या नियोजनाची माहिती दिली.

     विजेतेपदाचा मान

----- Advertisements -----

संगमनेर उपविभाग व शहर पोलीसांच्या वतीने घेण्यात आलेली एकता दौड अत्यंत उत्साहात पार पडली.

पुरुष गटाची स्पर्धा संगमनेर नगरपालिकेच्या क्रीडा संकुल ते नाशिक महामार्ग (१३२ केव्ही अकोले बायपास)

महिला गटाची स्पर्धा क्रीडा संकुल ते कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्गावर झाली.

विजेत्यांना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

विजेते स्पर्धक :- ज्येष्ठ नागरिक गट: अशोक नवले – प्रथम गणेशकुमार बाहेती – द्वितीय दीपक क्षत्रिय – तृतीय

----- Advertisements -----

मुलांचा गट: सुरज अनिल कदम – प्रथम, विशाल नंदू थोरात – द्वितीय, विजय रामनाथ सोनवणे – तृतीय

मुलींचा गट: धनश्री दत्तू हुलगिर – प्रथम वर्षा बाळासाहेब बर्डे – द्वितीय रूपाली मच्छिंद्र सोडणर – तृतीय

स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.

संत एकनाथ