उद्योजक बाळासाहेब देशमाने गावचे कंठमणी ! नंदा वलवे
स्वदेश ग्रुपने केले 151 विद्यार्थ्यांना सन्मानित ; शालेय साहित्याचे वाटप
संगमनेर भारत रेघाटे
स्पर्धेच्या युगामध्ये पुढे जायचं असेल तर आपली शैक्षणिक गुणवत्ता हाच एकमेव मार्ग आहे. परंतु मार्ग निवडताना विद्यार्थ्यांनी सदैव गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील राहावे तसेच भविष्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर नवोदय एन एम एस, स्पर्धा परीक्षा यांचा अभ्यास केला पाहिजे. संस्कारक्षम बनण्यासाठी शिक्षक व पालकांच्या सूचनेचे पालन केले पाहिजे. आज्ञापालन करता आली पाहिजे. सुजाणशील व्यक्तिमत्व हाच आयुष्याचा दागिना होय. शिक्षण आयुष्याला गती आणि दिशा देत असते असे प्रतिपादन पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी नंदा वलवे यांनी केले.

धांदरफळ बुद्रुक येथील लोकमान्य विद्यालय व के. बी. दादा देशमुख महाविद्यालयातील दहावी बारावी 2024 -25 च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. या सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन स्वदेश ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते. वलवे म्हणाल्या की, धांदरफळ बुद्रुक या गावासाठी बाळासाहेब देशमाने या यशस्वी उद्योजकांने एक वेगळा आदर्श घालून दिला. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी त्यांच्या यशाचे कौतुक व्हावे. हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून हा सोहळा संपन्न होत आहे.

बाळासाहेब देशमाने यांनी गावची बांधिलकी जपली आहे. ते सदैव गावासाठी समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नेहमीच तत्पर असतात असे व्यक्तिमत्व लाभणे म्हणजे गावासाठी भाग्य असून ते या गावचे कंठमणी आहेत. विद्यार्थ्यां बरोबर शिक्षण, आरोग्य, वृक्षारोपण, पर्यटन, तीर्थक्षेत्र ,ग्रामविकास यासारख्या कामांमध्ये बाळासाहेब देशमुख अग्रणी असतात असे त्या म्हणाल्या.
शिक्षणाशिवाय आयुष्याला गती मिळणार नाही. ----उद्योजक रामहरी कातोरे म्हणाले की, शिक्षणातून माणसाच्या आयुष्यात प्रगतीचे क्षण अनुभवायला मिळतात. परंतु आज मुलांच्या हातामध्ये आला. मोबाईलचा अतिरेक वापर यशापर्यंत जाऊ देत नाही. विद्यार्थी मोबाईलच्या विश्वात रमले आहेत. विद्यार्थ्यांनो आता जागे व्हा ! शिक्षण क्षेत्रामध्ये मुलींचे यशस्वी होण्याचे प्रमाण वाढत आहे. पुढील काळ कठीण आहे. शिक्षणाशिवाय आयुष्याला गती मिळणार नाही. आयुष्याचा राज्यमार्ग जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर शिक्षणच महत्वाचे आहे. आपल्या आयुष्याला सुंदर करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे उद्योजक कातोरे म्हणाले. कोणताही विद्यार्थी सुविधे पासून वंचित राहू नये. आपल्या आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये भेद निर्माण होऊ नये यासाठी देशमाने यांचा शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी मार्गदर्शक राहील.
यावेळी सरपंच उज्वला देशमाने म्हणाल्या की, लोकमान्य विद्यालयाची निकालाची परंपरा चांगली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर व सन्मान ठेवावा यामुळे आपल्याला संस्काररूपी दागिना प्राप्त होतो. आपली वेगळी ओळख निर्माण करतो. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन गावाचे, विद्यालयाचे नाव गुणवंतांच्या यादीत झळकविण्यासाठी प्रयत्न करावा. यावेळी शिक्षण सेवकांचे ग्रामस्थांच्या वतीने कौतूक करण्यात आले.
केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव म्हणाले की, गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा. या विद्यालयाचा शिक्षण स्तर उंच राहण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. मी येथील माजी विद्यार्थी असून रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे. यावेळी युवा उद्योजक ओंकार देशमाने म्हणाले की धांदरफळ या मायभूमीतून माझे वडील उद्योजक बाळासाहेब देशमाने यांनी याच विद्यालयातून शिक्षण घेऊन आपल्या आयुष्याची सुरुवात केली आज बांधकाम, रियल इस्टेट क्षेत्रातील यशस्वी उद्योजक झाले आहे समाजातील गरीब हुशार होतकरू विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर राहू नये, कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम राबवतो.
या प्रसंगी योग प्रशिक्षिका सारिका परदेशी म्हणाल्या की,आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर आपल्याला ध्यानधारणे शिवाय पर्याय नाही. आज माणूस अनेक विचाराने आणि व्यापाने त्रस्त आहे. यातून शांतता मिळण्याकरता उत्तम आरोग्य निर्माण करण्याकरता योग्य आहार, योग्य साधना, हेच आपल्याला आरोग्यमय जीवन देऊ शकतात. यासाठी दिवसभरातील दहा मिनिटं योग व प्राणायामाने दिवसाची सुरुवात केल्यास निश्चितच उत्तम आरोग्य प्राप्त होईल.
या मान्यवरांची होती उपस्थिती
यावेळी सामाजिक शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सामाजिक कार्यकर्त्या लता कातोरे, स्वदेश महिला मंच अध्यक्षा संगीता देशमाने, नवनाथ देशमाने, मनोज कवडे, वंदना कवडे, माजी सभापती अनिल देशमुख, संतुजी नाईकवाडी, भिकाजी काळे, अशोकराव वलवे, रावसाहेब डेरे,शिरीष कवडे, नितीन देशमुख, डॉक्टर संजय थोरात, बाळासाहेब कवडे, विठ्ठल डेरे ,भिकाजी काळे, नामदेव खुरपे ,दीपक देशमुख, संतोष देशमुख, लक्ष्मण काळे, अविनाश देशमुख, नवनाथ नाईकवाडी, सचिन देशमाने, मोहन देशमाने, राजेश शिंदे, तसेच गुणवंत विद्यार्थी, पालक, पंचक्रोशीतील ग्रामस्थ शिक्षक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी केले तर आभार श्री दोरगे यांनी मानले.
