ब्रेकिंग न्यूज :
भारत

उपमहाव्यस्थापकांनी कोणते सर्वेक्षण केले ? नागरिकांचा संतापजनक सवाल ; सीसीटीव्ही फुटेज बंद ; गेटच बनले ही इमर्जन्सी !

Blog Image
एकूण दृश्ये: 191

उपमहाव्यस्थापकांनी कोणते सर्वेक्षण केले ? नागरिकांचा संतापजनक सवाल; सीसीटीव्ही फुटेज बंद ; गेट बनले  इमर्जन्सी ! बंद का ? सुरक्षेचा अभाव; संगमनेर बस स्थानक समस्यांच्या विळख्यात 

     संगमनेर  { भारत रेघाटे }

नुकतेच संगमनेर बस आगार, स्थानकाचे इति सर्वेक्षण उप महाव्यस्थापक या़ंनी केल्याचे दोन उलटत नव्हे तर संगमनेर आगार आणिअअ स्थानकाच्या अनेक समस्यांचा पाढाच येथील नागरिकांनी वाचून दाखवला आहे.

        शनिवारी बस स्थानकात एका निवृत्त लेखापालास सुरक्षेच्या अभावामुळे आपला जीव गमावा लागल्याने संगमनेरकरांनी आगाराबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उभे करून थेट ढिसाळ असलेल्या व्यवस्थापनालाच संतप्त सवाल करताना दिसून येत आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रात बस आगाराचे सर्वेक्षण सुरू असून हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान अंतर्गत संगमनेर बस स्थानकाचे मंगळवार दिनांक 29 रोजी दुसरे सर्वेक्षण पार पडले खरे. या सर्वेक्षणामध्ये बाग, बगीचा, बसेस, आगार ,स्थानक परिसर स्वच्छता, सुलभ शौचालय, तसेच चालक वाहक कक्ष, वाहतूक नियंत्रण कक्ष आदिचे सर्वैक्षण झाले परंतु गरजेच्या सुरक्षेपेक्षा भलत्याच भागाची पाहणी केली का असा थेट सवाल नागरिकांनी उपव्यवस्थापक, परिवहन मंत्री तसेच आगार प्रमुखांना केला आहे.

----- Advertisements -----

          संगमनेर बस स्थानका हे सातत्याने नागरिक आणि प्रशासनाच्या नजरेत भरणारे असे नेहमीच बोले जाते. असे असले तरी बस स्थानक आगार आणि दोन्ही कडील प्रवेशद्वारा पैकी वापरासाठी निर्माण केलेले प्रवेशद्वारच बंद राहत असून केवळ इमर्जन्सी गेट बनल्याचे दिसून येत आहे. दर्शनी भागात कच-याचे साम्राज्य , नित्याचेच सीसीटीव्ही फुटेज बंद, भिकाऱ्यांचा उपद्रव, अस्तव्यस्त पार्किंग, तसेच जनावरांचा या भागात वावर सेनानी मातीला फुटपाथ अशा अनेक कारणांमुळे संगमनेर बस स्थानक एकूणच समस्येच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे. असे बोलले जाते की, केवळ बस स्थानक कमानीच्या आतील भाग हा संगमनेर आगाराकडे येतो. कमानीच्या बाहेरील भाग हा सोसायटी, गाळा धारक आणि कॉन्ट्रॅक्टर तर सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेच्या अखत्यारीत येतो तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असूनही ते बंद अवस्थेत असतात. एकूणच बस स्थानक आगाराची व्यवस्था अनेक लोकांच्या हातात असल्याने समस्या सोडविण्या ऐवजी प्रश्नांचा फुटबॉल होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात आणखी भर म्हणून प्रवासी सुरक्षा, भिकारी यांचा वाढता राबता, पार्किंग, व्यवस्था, टवाळखोर, प्रेमी युगुल, आदि समस्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे बनले असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.‌ यावर सक्त अशी कारवाई करणे तर दूरच परंतु कोणीही वाच्यता करताना दिसून येत नाही. 

अकोले गेट बनले इमर्जन्सी गेट

संगमनेर बस स्थानक हे अख्या महाराष्ट्रात हायटेक बस स्थानक म्हणून गणल्या गेले असून एक आकर्षक देखणे बस स्थानक म्हणून या बस स्थानकाकडे बघितल्या जाते. यामध्ये पुणे नाशिक रोडवर बस स्थानकात येण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे तर दुसरे प्रवेशद्वार हे अकोल्याकडे जाणाऱ्या रोडवर आहे. बस स्थानका निर्माणामध्ये आजही काही प्रमाणात त्रुटी आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये दुपारी दोन नंतर सूर्यप्रकाशाचा प्रचंड त्रास प्रवासांना सहन करावा लागतो. अकोले कडे जाणाऱ्या गेट जवळ व्यावसायिकतेला प्राधान्य दिल्याने त्यातच भंडारदरा अकोले आदि भागात जाणाऱ्या येणाऱ्या बसेस आणि स्थानकात वळण घेताना बस चालकामध्ये अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते असल्याने तसेच सदरचे गेट सुरू केल्यास नागरिक, दुचाकीस्वार या गेटचा वापर करताना आढळून येतात असे कारण पुढे करीत सदर गेट बंद ठेवल्या जात असल्याचे म्हणणे आहे.. किंबहुना बस स्थानकात वळण घेणाऱ्या बस वाहतुकीस ती अडचण होऊ शकते. तसेच गेट सुरू केल्यास सार्वजनिक रहदारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणास्तव अकोले कडील गेट हे अत्यावश्यक सेवा अथवा इमर्जन्सी गेट म्हणूनच वापरल्या जाते.

बस स्थानकाची सुरक्षा नजरेआड     नागरिकांच्या नजरेत सातत्याने बसत असलेली बस स्थानकाची सुरक्षा नजरेआड केली जात असल्याने यावर नेहमीच टीका टिपणी केली जाते. त्यामध्ये भिकाऱ्यांचे प्रश्न, पाकीट मार, चोरी, गंठण चोरी मोबाईल चोरी, अपघात असे अनेक प्रकार घडतात. याकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोपच नागरिकांनी केल्या आहे. त्याबाबत पोलीस प्रशासनाला वारंवार आगारा मार्फत पत्रव्यवहार केला जातो. परंतु त्याची फारशी दखल पोलीस प्रशासनाकडून घेतली जात नसल्याचे काल झालेल्या घटनेवरून नमूद होते. भिकारी लोकांची आबादी आणि चोरट्याचे अगणित प्रमाण लक्षात येते. बस स्थानकात सुरक्षा पोलीस कर्मचारी अधून मधून कधीतरी चमकताना दिसून येतात. याकडेही नागरिकांनी लक्ष वेधले. परंतु पोलीस प्रशासना कडून फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे स्पष्ट दिसून येते .

राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार गटाचे राज्य कार्यकारिणीचे प्रमुख ज्ञानेश्वर गायकर म्हणाले की, बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागतो. कंट्रोलर मदत करत नाही. शिवशाही सारख्या बसेस बंद पडतात. एवढेच नव्हे तर बस रिकाम्या धावतील परंतु संगमनेर बस स्थानकात येण्या ऐवजी पुणे नाशिक महामार्गा वरून सुसाट जात राज्य परिवहन महामंडळाने सेवा सुरळीत नसण्याचे सांगत पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावर बस बंद पडतात. महामंडळ याकडे लक्ष देत नसल्याचे गायकर म्हणाले.

पत्रकार सतिश आहेर शिवसेनेचे संतोष मुर्तडक यांचे मोलाचे योगदान !संगमनेर बस स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येत असला तरी यास अटकाव करण्यासाठी तसेच बस स्थानकाचे रूपडे प्रवाशी आणि नागरिकांच्या नजरेत भरण्यासाठी शिवसेनेचे संतोष मुर्तडक, पत्रकार सतीश आहेर हे सातत्याने लक्ष ठेवून असतात. येथील कचऱ्याबाबत, भिकाऱ्याबाबत, तसेच जनावराबाबत ते सजग राहून सातत्याने काळजी घेतात. तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज व सुरक्षा रक्षक 24 तास तत्पर असावेत यासाठी ते पुढाकार घेताना दिसून येतात .परंतु व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे नित्याचेच डोकेदुखी बनली असून आगाराची अवस्था दुर्लक्षित झाल्याचे दिसून येते. हे विसरून चालणार नाही. तर दुसरीकडे बस स्थानकाला साजेसे रूप देण्यासाठी प्लॅटफॉर्मची सजावट करण्यासाठी निमाई स्वीटचे व्यावसायिक शुभम घुले, संदेश चष्माघरचे देशमुख, संतोष साळुंखे , दत्तात्रय देव्हारे यांनी चंदनापुरी, विठ्ठल कडा, भंडारदरा, निळवंडे धरण, वेलकम आदिभाग दर्शनी आकर्षक फ्लेक्स लावून साजेसा प्रयत्न केलेला दिसून येतो. डस स्थानकाला लक्ष केंद्री करण्यासाठी पत्रकार सतीश आहेर आणि शिवसेनेचे संतोष मुर्तडक हे नेहमी तत्पर असतात विशिष्ट रक्कम खर्च करून चार पिलर रंगरंगोटी केली. बेशिस्त नागरिक कचरा टाकून घाण करत असत तंबाखू पान खाऊन पिचकारी मारल्या जातात असत त्यास प्रतिबंध करण्यासाठी परिसरातील निसर्गरम्य असे फ्लेक्स लावले. नागरिकांनी प्रवाशांमध्ये अवेअरनेस आणण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. प्रशासनाने त्यांच्या कार्याची दखल घेण्याची गरज असल्याचे नागरिका मधून बोलले जात आहे. सार्वजनिक ठिकाणाचा वापर नागरिकांनी नीट करावा तसेच राज्य परिवहन विभागाने आपली जबाबदारी न झटकता दक्षता घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

----- Advertisements -----

श्रम हेच यशाचे खरे साधन आहे.

लोकमान्य टिळक