ब्रेकिंग न्यूज :
भारत

*धक्कादायक ! संगमनेर ग्रामीण भागातील घटना ; दहा वर्षापासून सुरू होता प्रकार ;*

Blog Image
एकूण दृश्ये: 701

धक्कादायक  ग्रामीण भागातील घटना ; दहा वर्षापासून सुरू होता प्रकार ;* तब्बल 69 वेठबिगार कामगारांची सुटका ; 45 पुरुष महिलासह 24 बाल कामगाराचा समावेश. जिल्हाधिकाऱ्यांनी दिला कारवाई आदेश

      संगमनेर प्रतिनिधी

तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कौठे मलकापूर, कर्जुले पठार येथील दगडखानीवर काम करणाऱ्या 69 वेठबिगार कामगाराची सुटका करण्यात आली असून यामध्ये तब्बल 45 वेठबिगार कामगारात 22 पुरूष, 16 महिला तर एकूण 24 बालकामगाराचा समावेश आहे. या कार्यवाहीत 6 ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली. त्याचे अन्य चार साथीदार फरार आहेत.

   याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना प्राप्त झालेल्या तक्रारीवर प्रशासनाने तत्परतेने कारवाई केली आहे. सदर घटनेने संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

 *जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आदेश* जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पालघर जिल्ह्यातून आणलेल्या वेठबिगार कामगाराची ठेकेदाराच्या मनमानी पिळवणुकीतून सुटका करण्यात आली. अहिल्यानगर सह संगमनेर तालुक्यातील 10 ते 12 जणांच्या तीन पथकाने ही मुक्तता मोहीम राबविली आहे. या मोहिमेत सरकारी कामगार अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीनी ही धडक कारवाई केली. यांच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायदा व वेठबिगार पद्धती उच्चाटन अधिनियम, १९७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुटका करण्यात आलेले सर्व वेठबिगार स्त्री, पुरूष, बालकामगार पालघर जिल्ह्यातील असून, तहसीलदार धीरज मांजरे यांनी बंधमुक्तता प्रमाणपत्र दिले. पोलीस संरक्षणात या कामगारांना पालघर येथे रवाना करण्यात आले. तत्पूर्वी मुक्तता केलेल्या स्त्री, पुरुष आणि बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तद्वतच प्रशासनाच्या वतीने या 69 कामगारणी भोजन व्यवस्था करण्यात आली . वेठबिगारीतून मुक्त झालेल्या कामगारांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

----- Advertisements -----

 _*दहा वर्षापासून सुरू होता प्रकार*_ 

सुभाष मोरसिंग राठोड मधुकर शिवलाल दळवी या दोघांनी पालघर जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत वेठबिगारी कामातुन खडी फोडण्याच काम लावून अत्यंत कमी मोबदल्यात काम करून घेत पिळवणूक करण्यात आली.  सुमारे दहा वर्षापासून या कामगारांच्या अज्ञानाचा, गरिबीचा फायदा घेत खडी फोडण्याचे काम जबरदस्तीने त्यांच्याकडून करून घेत असत. पिंपळगाव देपा येथून 19 मजूर, साकुर तासकरवाडी येथून 15 मजूर ,तसेच यापूर्वी सदर ठिकाणी कामावर असलेले 11 असे 45 महिला आणि पुरुषांच्या यामध्ये समावेश आहे. याच परिसरातील तब्बल 69 वेठबिगार कामगार महिला, पुरूष, लहान मुलांची सुटका करीत प्रमाणपत्र दिले.

 दोन ठेकेदारांना अटक ; चार जण फरार

कामगार अधिकारी एस पी हरमळकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुभाष मोर्सिंग राठोड शेंडेवाडी संगमनेर, मधुकर शिवलाल दळवी राहणार कौठे मलकापूर या दोघासह अन्य फरार चार असे एकूण सहा आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 146, 35 उच्चाटन अधिनियम 1976 चे कलम 16, 17, 18 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध नियम 1989 चे कलम बालकामगार प्रतिबंध अधिनियम 1986 चे कलम 314 सह अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण प्रमाणे कायदा 215 चे कलम 75, 69 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून  आरोपी सुभाष मोर्सिंग राठोड शेंडेवाडी संगमनेर, मधुकर शिवलाल दळवी राहणार कौठे मलकापूर दोघांना अटक करण्यात आली असून त्यांचे चार साथीदार फरार आहेत.

----- Advertisements -----

कठीण काळातही आत्मविश्वास ठेवा.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin