ब्रेकिंग न्यूज :
भारत

दुष्काळी भागात जलक्रांती आणणार-डाॅ विखे पाटील

Blog Image
एकूण दृश्ये: 20

दुष्काळी भागात जलक्रांती आणणार-डाॅ विखे पाटील

निधी कमी पडू देणार नाही

अठरा वर्षात त्यांनी फक्त पाच कोटी खर्च केले.

      संगमनेर  प्रतिनिधी 

त्यांनी अठरा वर्षात फक्त ५ कोटी रुपये खर्च केले.पुढच्या अडीच वर्षात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आ.अमोल खताळ यांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांच्या विकास कामाचे नियोजन करून दुष्काळी भागाला सुजलाम सुफलाम करणार असल्याची ग्वाही पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

 

भोजापूर चारीचा जलपूजन सोहळा नान्नज दुमाला येथे डॉ सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यानिमित्ताने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी नीलम खताळ, भीमराव चतर, विठ्ठलराव घोरपडे संदीप देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे म्हणाले,४० वर्ष सत्तेत राहून पाणी न आणणाऱ्यांना जनतेनं बाजूला केलं आणि महायुतीवर विश्वास ठेवला. आज त्या विश्वासाला उत्तर दिले जात आहे. मी यापूर्वी शब्द दिला होता की ज्या दिवशी पाणी पोहोचेल, त्या दिवशीच मी इथे सभा घेईन आज तो दिवस आहे. ही केवळ सभा नाही तर जनतेच्या आश्वासन पूर्तीची साक्ष आहे.

----- Advertisements -----

विखे म्हणाले की,अमोल खताळ यांनी हा संपूर्ण भाग पाणीदार करण्यासाठी जिद्दीने पाठपुरावा केला. जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा भाग आता जलसमृद्ध होतोय. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली याचा सार्थ अभिमान आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाषणाच्या शेवटी एक खास विनंती करत सांगितले, नीलम खताळ यांनी आमदार खताळ यांना सांगावे, की आम्ही विधानसभेत पाण्याविषयी विचारलेले प्रश्न अजूनही उत्तराशिवाय आहेत. ती भाषणे घेऊन यशोधन कार्यालयात पोहोचवावीत, जेणेकरून आम्हाला त्यांची उत्तरं मिळतील.

ही जलक्रांती केवळ विकासाचे प्रतीक नाही, तर सत्तांतरानंतर जनतेच्या अपेक्षांना मिळालेलं ठोस उत्तर आहे. महायुतीच्या नेतृत्वात संगमनेर तालुका जलस्वावलंबनाच्या दिशेने पुढे जात आहे. पाणी, रस्ते, शेती, शिक्षण, आरोग्य या साऱ्या क्षेत्रांतील कार्यक्षम नेतृत्वच खरा विकास घडवू शकते, असा ठाम विश्वास डॉ . सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

नीलम खताळ म्हणाल्या की, वर्षानुवर्षं महिलांनी पाण्यासाठी होरपळ सोसली. आज त्या प्रतीक्षेला न्याय मिळाला आहे. सुजय विखे आणि नामदार विखे पाटील यांनी दिलेला शब्द आमदार खताळ यांनी खरा करून दाखवला आहे. तालुका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

 

----- Advertisements -----

 

 

स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.

संत एकनाथ