ब्रेकिंग न्यूज :
भारत

दीप प्रज्वलाने होणार लेखक संदीप वाकचौरेच्या पुस्तकाचे प्रकाशन

Blog Image
एकूण दृश्ये: 64

दीप प्रज्वलाने होणार लेखक संदीप वाकचौरेच्या पुस्तकाचे प्रकाशन ;  विविध क्षेत्रातील मान्यवर राहणार उपस्थित ; साधणार वाढदिवसाचे औचित्य 

     संगमनेर भारत रेघाटे

जनमानसात आणि वाचकापर्यंत आपल्या लिखाणातून दिशादर्शक मांडणी करणारे संगमनेर येथील पत्रकार व लेखक संदीप वाकचौरे यांचे शिक्षण रंग व भाषा शिक्षण या दोन पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि 17 ऑगस्ट रोजी पुण्यात होणार असल्याची माहिती चपराचे संपादक घनश्याम पाटील यांनी दिली. 

   या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ अभिनेते निर्माते व दिग्दर्शक अरुण नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली. तसेच अभिनेते चित्र नाट्य निर्माते अभिराम भडकमकर यांच्या शुभहस्ते आणि कुतवळ फुड्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राम कुतवळ प्रमुख अतिथीच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.  पुणे येथील पत्रकार भवनात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या  उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.

----- Advertisements -----

पत्रकार साहित्यिक संदीप वाकचौरे यांच्या 'एक लेखक, एक प्रकाशन व एक विषय' या प्रादेशिक भाषेतील पहिल्याच प्रयोग मालेतील हे चौदावे पुस्तक आहे. यापूर्वी चपराक प्रकाशानाच्या वतीने ऐसपैस शिक्षण, परिवर्तनाची वाट, शिक्षणाचीया द्वारी, शिक्षणनामा, शिक्षणाचे पसायदान, परिवर्तन शिक्षण ,सृर्जनाची वाट , विनोबांची शिक्षण छाया, शोध शिक्षणाचा, पाटी पेन्सिल, शिक्षणाचे दिवा स्वप्न, शिक्षणाचे प्रश्नोपनिषद अशी एकूण 14 पुस्तके चपराक प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आली आहेत. अवघ्या दोन वर्षांमध्ये ही 14 पुस्तके प्रकाशित झाले. यातील अनेक पुस्तकांच्या आवृत्ती पहिल्या दोन-तीन महिन्यातच संपलेल्या आहेत. वाचकांनी अधिक चांगला प्रतिसाद दिला आहे असे घनश्याम पाटील यांनी सांगितले.

       संदीप वाकचौरे यांची शिक्षण विषयक विविध सदरांचे लेखन प्रसार माध्यमामधून सातत्याने केले आहे. विविध वृत्तपत्रासाठी ते स्तंभलेखन करत असून राज्य शासनाच्या विविध शिक्षण समितीच्या सदस्य आहेत. राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समिती व बालभारती कार्यगट सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. शासनाच्या विविध प्रशिक्षणात साहित्य निर्मिती विकसन व राज्यस्तरावर मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. जास्तीत जास्त वाचकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वप्न पाहा आणि ते साकार करण्यासाठी मेहनत करा.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम