ब्रेकिंग न्यूज :
भारत

दोनशे ₹ उसनवारी :मित्र बनला वैरी; एकाचा खून !

Blog Image
एकूण दृश्ये: 312

दोनशे ₹ उसनवारी :मित्र बनला वैरी; एकाचा खून ! चौघांवर गुन्हा ; पुण्यातून एकास तर तिघांना आश्वीतून घेतले ताब्यात; चार दिवस कोठडी 

     संगमनेर : प्रतिनिधी

अवघ्या दोनशे रुपयांच्या उसनवारीतून झालेल्या वादात मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे घडल्याने संगमनेर शहर, तालुका आणि ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे.

आश्वी बुद्रुक येथे राहणारा गौतम जयराम गायकवाड यांचे गाडीवर आसिफ सलीम शेख असे दोघे आले. प्रतापपूर शिवारातील इरिगेशन बांग्ला मागील महादेव मंदिराच्या ओट्यावर आसीफ सलीम शेख, सोहेल आंधळे, पप्पू भांड, गौतम गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली. आसिफ शेख यांनी मतीन याच्या पोटात लोखंडी रॉड घुसवला त्यानंतर जखमी यास प्रथम आश्वी बुद्रुक येथील डॉ. गणेश गायकवाड यांचे दवाखान्यात नेण्यात आले सदर ठिकाणी मयताची आई व भाऊ हे आले त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पीएमटी हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास सांगितल्याने ते जखमीस पीएमटी हॉस्पिटल येथे घेऊन गेले व पीएमटी हॉस्पिटल येथून पहाटे चार वाजता ससून हॉस्पिटल पुणे येथे नेण्यात आले व सदर ठिकाणी यातील जखमी हा सकाळी दहा वाजता मयत झाल्याची माहिती मिळाली. 

----- Advertisements -----

सदरची घटना शुक्रवार दि.८ ऑगस्ट रोजी रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास घडली. जखमी मतीन याच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारसाठी पुणे येथे दाखल केले. मात्र, सकाळी औषधोपचारा दरम्यान मतीन याचा मृत्यू झाला. मतीन मेहबूब शेख ( वय 28 ) उमरी रोड आश्वी असे या घटनेत मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. आसीफ शेख याला उसने दिलेले दोनशे रुपये त्याच्या वडिलांकडे मागितल्याचा राग आल्याने त्याने पाठीत खिळा भोसकून जखमी केले. मयत मतीन शेख याची आई बिलकीस ऊर्फ शाकिरा महेमूद शेख यांनी आश्वी पोलीसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 103 (1) 3 (5) प्रमाणे चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघा पैकी असीफ शेख यास पुण्यातून तर बाकीच्या तिघांना आश्वी येथून अटक करण्यात आली असून 14 जुलै पर्यंत रिमांड देण्यात आली. पुढील तपास आश्वी पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी पोलीस करीत आहेत.

सुखाचे रहस्य समाधानात आहे.

संत ज्ञानेश्वर