दिलशाद शेख महाराष्ट्र शासनाच्या "विशेष पुरस्कारांने" सन्मानीत
संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर साहित्य परिषदेच्या सदस्या, सेवा निवृत्त प्राचार्या दिलशाद इदरीस शेख यांच्या शाळास्तरावर उर्दू भाषेच्या प्रगती तसेच पुणे बोर्डात अर्थशास्त्र विषयात उर्दूत भाषेत केलेले कार्य वाय,सी,एम उर्दू सेंटर सुरू करणे अशा विविध कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासन उर्दू साहित्य अकादमीच्या विशेष पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. उर्दू साहित्य अकादमीच्या सुवर्ण महोत्सवा निमित्ताने "बहारे उर्दू "या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन अल्पसंख्यक विकास मंत्रालय च्या आयुक्त श्रीमती प्रतिभा इंगळे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.

६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान एस,वी,पी, डोम वरळी मुंबई येथे उर्दू साहित्य अकादमीला ५० वर्षे पूर्ण झाल्याने सुवर्ण महोत्सवाचे उदघाटन अल्पसंख्यक व अवकाफ मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात प्रामुख्याने प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, हास्य अभिनेता शेखर सुमन,सचिन पिळगावकर,हास्य कवी सुरेंद्र शर्मा, कपील शर्मा शो फेम अली असगर, प्रसिद्ध गज़ल गायक झेलम सिंग प्रसिद्ध कव्वाल साबरी ब्रदर्स सह अनेक सेलेब्रिटीनीं हजेरी लावली. एका पेक्षा एक रंगारंग कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आले.

पुरुस्कार मिळाल्या बद्दल मुंबई चे जग प्रसिद्ध शायर डॉ,कसीम ईमाम सा,गुलबुटेचे संपादक फारुख सय्यद, ऍंग्लो उर्दू हायस्कुल चे चेअरमन शेख गनी हाजी, डॉ,नुसरत फाऊंडेशन चे अध्यक्ष सय्यद असिफ अली माजी पोलीस निरिक्षक दिलावर सय्यद,अब्दुल्ला चौधरी, व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, सचिव अमोल मतकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख तसेच सदस्य आदींनी दिलशाद इदरीस शेख यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
