दंडकारण्य अभियानाचे फलित ; तालुक्यासह डोंगरही झाले हरित - माजी मंत्री थोरात
85 एकरात फुलवली वनराई फुलवली ; 20 व्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ
संगमनेर : प्रतिनिधी
झाडे लावणारा माणूस हे पुस्तक वाचून प्रेरणा घेत स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षांबाबत मोठी जागृती झाली आहे. विविध उघडी बोडके डोंगरांसह तालुका हिरवागार झाला असून या अभियानाची देशपातळीवर दखल गेली असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

मालदाड मायंबा डोंगर कानिफनाथ मंदिर परिसरामध्ये जयहिंद लोक चळवळ व अमृत उद्योग समूहाच्या वतीने 20 व्या दंडकारण्य अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात थोरात बोलत होते..डॉ. सुधीर तांबे, ॲड. माधवराव कानवडे, संपत डोंगरे, सुधाकर जोशी, बी आर चकोर, सरपंच गोरख नवले, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, योगेश भालेराव, गोरख नवले, प्रा. बाबा खरात, दशरथ वर्पे, जगन्नाथ घुगरकर, अनिल शिंदे , डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले की, सरपंच गोरख नवले यांनी मालदडमध्ये अत्यंत चांगले काम केले असून 85 एकरवर वनराई फुलवली आहे. विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे मोठा बदल येथे झाला आहे. दंडकारण्य अभियान यामुळे तालुक्यात वृक्षांबाबत मोठी जागृती झाली. उघडी बोडकी डोंगर हिरवीगार दिसू लागली आहे. तळेगाव भागातही वृक्षराई वाढली आहे. जे लोक काही करत नाही. ते मात्र नाव ठेवण्याचे काम करत असतात. त्यांनी किती झाडे लावली हा मोठा प्रश्न आहे. काही मंडळी चांगले चाललेले मोडायला निघालेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला भ्रमित करण्याचे काम सुरू इतरांबद्दल खोटे सांगून स्वतःबद्दल कौतुक केले जात आहे. देशभर हा काही पक्षांचा कार्यक्रम असल्याची टीका यांनी केली.
प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर योगेश भालेराव यांनी आभार मानले.
[ गोरख नवले आदर्श सरपंच 85 एकर वर वनराई फुलवली ]
जनतेच्या विकासाचा ध्यास घेऊन गोरख नवले यांनी विकास कामांचा पाठपुरावा केला. 85 एकर वर वनराई फुलवली असून धडाडीने काम त्यांचे सुरू आहे. संगमनेर ते चिंचोली गुरव रस्ता पूर्ण केला. या सर्व कामांसाठी पाठपुरावा करणारे गोरख नवले हे जनमान्य आदर्श सरपंच असल्याची प्रशंसा थोरात यांनी केली.
