तालुक्यात आमदार खतांळाच्या विरोधात संतापाची लाट ;माजी मंत्री थोरातांच्या प्रयत्नातून मंजूर केलेले करोडो रुपयांची कामे रद्द
संगमनेर { प्रतिनिधी }
नूतन लोकप्रतिनिधी अमोल खताळ यांना काही महिनेच राजकारणात येऊ झाले. त्यांनी विकासासाठी कोणताही निधी न आणता राजकारणासाठी तसेच आपल्या जवळच्या हितकारक ठेकेदारांना देण्यासाठी मंजूर केलेली कामेच रद्द करण्याची मनमानी नूतन लोकप्रतिनिधी सुरू केली असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर आमदार खताळ यांच्या विरोधात तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

खेमनर म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांनी 13 मार्च 2024 रोजी ग्रामविकास विभागाकडे संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करावे याबाबत मागणी केली होती. त्यानुसार शासननाचा आदेश याबाबतचे पत्र 4 ऑक्टोबर 2024 नुसार टप्पा दोनच्या निर्णयानुसार 40 कोटी 73 लाख 81 हजार रुपयांचे निधी शासकीय मान्यता देण्यात आली होती .

येथील रस्ते आणि प्रकल्प आणि विकासासाठी डिग्रस ते रणखांबवाडी, चिखली ते जवळेकडलग, खरवंडी ते खांबे, मिर्जापुर ते धांदळफळ, पारेगाव खुर्द तिगाव वडझरी, आदि भागातील आणि तालुक्यातील विविध ठिकाणचे रस्ते आणि प्रकल्पासाठी सदरचा निधी मंजूर करण्यात आला होता.

परंतु 7 ऑगस्ट 2025 च्या नव्या आदेशानुसार ही सर्व कामे रद्द करण्याचा शासनाकडून मनमानी निर्णय घेण्यात आला. खेमनर म्हणाले की, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री थोरात यांनी सातत्याने संगमनेर शहरासह, तालुक्यात विकास गंगा आणली. चाळीस वर्षात थोरात यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झालेली आहेत हे जनतेलाही माहिती आहे. परंतु माजी मंत्री थोरातांच्या पाठपुराव्यातून आलेला निधी रद्द करण्यात आली यामुळे तालुक्यात नूतन लोकप्रतिनिधी खताळ यांचा दडपशाहीचाच हा प्रकार असल्याचे नागरिकात बोलले जात आहे. एकूणच त्यांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली असून हा मनमानीचा निर्णय दुर्दैवी आणि एकप्रकारे हुकूमशाहीच असल्याने सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

