ब्रेकिंग न्यूज :
भारत

तब्बल 60 तासानंतर आढळून आला मृतदेह ;विजय कुटे चा मृतदेह आढळला

Blog Image
एकूण दृश्ये: 324

तब्बल 60 तासानंतर आढळून आला मृतदेह ;विजय कुटे चा मृतदेह आढळला 

   संगमनेर ;भारत रेघाटे

ड्युटीला जात असताना नदीपात्रात फुले टाकून नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीला निघालेल्या एका व्यक्तिचा नदीपात्रात तोल गेल्याने ते नदीत वाहून गेल्याने संगमनेर शहरासह तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले होते. अखेर तब्बल 60 तास उलटल्यानंतर सदर व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. दोन दिवस उलटूनही मृतदेह सापडत नसल्याने शहरात शोकाकुल वातावरण पसरले होते.

सदरची घटना श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरातील प्रवरा नदी संगमनेर खुर्द कडे जाणाऱ्या छोट्या पुलावर मंगळवार दि. 26 रोजी रात्री 9 ते 10 च्या दरम्यान ही घटना घडली . या घटनेत विजय संभाजी कुटे वय 40 हे नेहमीप्रमाणे सिद्धकला हॉस्पिटल मध्ये कामास निघाले होते. तत्पूर्वी ते नदीमध्ये फुले टाकून पुढे जाणार होते. परंतु नदीत तोल गेल्याने त्यांचा घरच्यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाने दोन दिवस शोध घेऊनही ते सापडले अथवा कोणाच्या हाती लागले नव्हते आमदार अमोल खताळ आमदार, सत्यजित तांबे यांच्या सूचनेनंतर महसूल आणि पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. सदर व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गेली दोन दिवसा पासून पथके रवाने करण्यात आले होती.

तहसीलदार धीरज मांजरे, नायब तहसीलदार सुभाष कदम, मंडळाधिकारी धोंडिबा भालचिम, तलाठी पांडुरंग भुरे , तलाठी संतोष जाधव ,तलाठी प्रवीण डहाके, तलाठी संकेत काशीद, तलाठी अविष्कार थोरात, तलाठी संतोष लंके, कोतवाल प्रवीण पंधारे, कोतवाल संतोष खोले आदिंनी या शोध मोहिमेत महत्त्वाची भूमिका निभावली.

----- Advertisements -----

    विजय कुटे हे सिध्दकला हॉस्पिटल येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम होते. घरात आई ,वडील, पत्नी योगीता, मुलगा मुकुंद , मुलगी दुर्वा हे राहतात. हलाखीची परिस्थिती आहे. विजय कुटे यांच्यावर बितलेल्या प्रसंगाने संपूर्ण कुटुंब आणि संगमनेर शहर शोकाकुल झाले. ड्रोनव्दारे तपास केला जात होता. तपासी पथक या कामी इमर्जन्सी टीम व महसूलच्या कर्मचाऱ्यांनी संगमनेर पुलापासून ओझर बंधारा पर्यंत दोन दिवस शोध असताना विजय कुटे यांची बॉडी रायते वाघापूर शिवारात वाटीच्या डोहा दरम्यान शुक्रवार दि 29 रोजी सकाळी 11.30 च्या दरम्यान मृतदेह आढळून आला. शव विच्छेदना नंतर विजय कुटे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. अशी माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली. 

 

 

निस्वार्थपणे काम केले, तरच जीवन यशस्वी होते.

संत तुकाराम