ब्रेकिंग न्यूज :
भारत

तब्बल 58 तासानंतर संदीप केरेचा मृतदेह आढळून आला

Blog Image
एकूण दृश्ये: 618

तब्बल 58 तासानंतर संदीप केरेचा मृतदेह आढळून आला

       संगमनेर प्रतिनिधी

आपल्या दुचाकीसह नदीपात्रात वाहून गेलेल्या एका युवकाचा मृतदेह तब्बल 58 तासानंतर चिखली येथील मोठ्या पुलावर आढळून आला. गावातील काही तरूण नदीवर आंघोळीसाठी गेले असता त्यांना नदीच्या कडेला दगडाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. घटनेने चिखली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

        घटनेची माहिती समजताच चिखली, केरेवाडी परिसरातील ग्रामस्थ आणि केरे यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असता सदरचा मृतदेह संदीप केरे याचाच असल्याची त्यांना खात्री पटली. 

----- Advertisements -----

          या दुर्दैवी घटनेत केरेवाडी येथील संदीप भाऊसाहेब केरे वय 34 हे मृत झाले असून घुलेवाडी येथे त्यांचे शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतर केरेवाडीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीनी दिली आहे. 

      संदीप केरे हे रविवार दिनांक 28 ला रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान केस कापून आपल्या घरी परतत असताना दुचाकीसह नदीपात्रात वाहून गेले होते. सलग दोन दिवस नातेवाईक, ग्रामस्थ आणि महसूल विभागाचे कर्मचारी संदीप केरे यांचा शोध घेत होते. काल रात्री नऊ वाजेपर्यंत शोध घेऊनही ते कुठेही आढळून आले नाही. शोध लागत नसल्याने व रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती. या घटनेने केरेवाडीत शांतता पसरली होती.

चिखली गावातील काही युवक आज बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 ला नदीवर आंघोळीसाठी गेले असता नदीच्या कडेला त्यांना संदीपचा मृतदेह आढळून आला. संदीपच्या पश्चात आई शैला, वडील भाऊसाहेब,  पत्नी उषा आणि मुलगी 10 तर एक 11 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. संदीप हा एक प्रामाणिक कष्टाळूू, शेतकरी होता. त्याच्या जाण्याने चिखली- केरेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

----- Advertisements -----

स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.

संत एकनाथ
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin