ब्रेकिंग न्यूज :
भारत

ते म्हणतात, 'ते आम्ही नाही', त्या मुद्याशी आमचा संबंध नाही! ;वेदांतचे स्पष्टीकरण

Blog Image
एकूण दृश्ये: 173

ते म्हणतात, 'ते आम्ही नाही' ! त्या मुद्याशी आमचा संबंध नाही : वेदांतचे स्पष्टीकरण 

अवैध काही नाहीच, परवान्यासह शासकीय मर्यादेत सर्व व्यवहार 

 — डाके यांचा खुलासा!

        संगमनेर : ( प्रतिनिधी )

           17 वर्षात पहिल्यांदाच चुकीच्या पध्दतीने आणि अवैधेतेत नाहक आमचे नाव गोवले गेले असल्याचे सांगत शहरातील वेदांत शॉपीवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर स्वामीप्रसाद डाके यांनी घडलेल्या प्रकरणाबाबत आपले स्पष्टीकरणच दिले.

        शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत घडलेल्या प्रसंगाबाबत डाके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, अहिल्यानगर एलसीबीने केलेल्या कारवाईमध्ये सापडलेल्या आरोपींनी वेदांत वाईन्सचे नाव घेतले, ते का घेतले ? याची शहानिशा एलसीबीनेच करावी. त्यांनी बुनबुडाचे खोटे आरोप केले आहेत. आम्ही अवैद्य मद्य विक्री कधीच केली नाही आणि करत नसल्याचा दावा स्लामीप्रसाद डाके यांनी‌ केला. शहरासह तालुक्यात प्रसिध्द शासकीय परवानाधारक वेदांत चे नाव सर्वश्रुत असल्याने त्या मर्यादेतच वेदांत वाईनच्या माध्यमातून मद्य विक्री केल्या जात असल्याचेही कारण स्पष्ट करत खुलाशेवार माहितीच डाके यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

       गेली 17 वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जपत हा व्यवसाय आम्ही करीत असल्याचेही डाके यांनी सांगितले. काल झालेल्या कारवाई दरम्यान नाहक आम्हाला गोवले जात असून याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला आहे. तसेच “जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे” ज्या आरोपींना पकडले तर.यांची कसून चौकशी झाली‌ पाहिजे असेही ते म्हणाले. आरोपींच्या मागे लपलेला चेहरा एलसीबीने शोधला पाहिजे.

----- Advertisements -----

       अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवैध विक्री विरोधात केलेल्या कारवाई बाबत ते म्हणाले की घडलेल्या प्रसंगाबाबत प्रसारमाध्यमांनी वेदांत वाईन शॉप मधून वाजवी विक्री पेक्षा जास्त खोके विक्री झाली असून अल्पवयीनांही मद्य विक्री होत असल्याचा चुकीचा प्रसार केला आला आहे. हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

      स्वामीप्रसाद पुढे म्हणाले की, वेदांत वाईनमध्ये "फक्त वैध" परवाना धारकाना विक्री केली जाते. यामध्ये काहींना एक दिवसाचा, काहींना एक वर्षाचा, तर काहींना लाइफटाईम खरेदीचा परवाना असतो. 17 वर्षात आमच्या मार्फत कधीच अल्पवयीनांना मुलांना मद्य विक्री केली नाही आणि भविष्यात असा प्रकार होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

          कार्यवाहीत बाबत संशय व्यक्त करताना ते म्हणाले, हा प्रकार व्यापारी वर्गातील प्रतिस्पर्ध्यांचे षडयंत्र असावे.” गुन्हे शाखेने जप्त केलेला मुद्देमाल फक्त 24 बॉटल एका ठिकाणी, आणि 34 बॉटल दुसऱ्या ठिकाणी सापडले असून तो पूर्ण बॉक्स नसून दोन-तीन लोकांच्या माध्यमातून गोळा करून एकत्रित केलेला मद्यसाठा असू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. एलसीबी वर आमचा पूर्ण विश्वास असून घडलेल्या प्रकरणाची त्यांनी शहानिशा करावी. आमच्या विरोधात असलेले पुरावे सादर करावे प्रत्येक गोष्टीला तोंड देण्यास आम्ही समर्थ असल्याचेही डाके त्यांनी सांगितले.

शांतीसाठी संघर्ष करा, पण संघर्ष शांततेसाठीच असावा.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin