तो भूकंपच होता ! बोटा परिसरात झाला 2.4 रिक्टर स्केल भूकंप ; भंडारदरा, डिंभे येथील यंत्र बंद ; धरणावर भूकंप मापन यंत्राची गरज
संगमनेर : भारत रेघाटे
गेली अनेक वर्षापासून बोटा घारगाव परिसरात वर्षातून एक ते दोन वेळा भूकंपाच्या लहरी हमखास होतातच भूगर्भातील या हलचाली भूकंपाने नागरिकांमध्ये चांगलीच घबराट होत असते. रविवार दि 14 सप्टेंबर रोजी बोटा परिसरात सायंकाळी ५:२७ ला केळवाडी, कुरकुटवाडी, आंबी दुमाला, अकलापूर, तळपेवाडी, मसवंडी, मोधडवाडी, माळवाडी आदि परिसरात भूकंपाच्या हादऱ्याने नागरिकांमध्ये घबरायटीचे वातावरण पसरले होते. घरावरील पत्रे, घरातील वस्तू भांडी अस्ताव्यस्त पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवून अक्षरशः सैरावैरा नागरिक घराबाहेर पडले. एवढेच नव्हे तर बोटा परिसरातील नागरिकांनी रात्र जागून काढल्याचे समजते.

भूगर्भातील हालचाली कशा चालतात याबाबत तूर्तास आपण काही सांगू शकत नाही. भूकंपाचे ठराविक असे कोणतेही क्षेत्र नसते. भूकंप हा कधी, कुठेही आणि केव्हाही होऊ शकतो. साधारण पावसाळा संपण्यापूर्वी घारगाव, बोटा परिसरात वर्षातून एक ते दोन हलक्या लहरीचे सौम्य भूकंप झाल्याच्या नोंदी आढळतात. अशा छोट्याशा लहरीने फारसे नुकसान होत नसले तरी नागरिकांनी कोणतीच भीती न बाळगता दक्षता म्हणून घरामध्ये जड वस्तू ठेवू नयेत, घराची डागडुजी त्वरित करून घ्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये, छोटी, छोटी भूकंप लहरी ह्या भविष्यात त्याचे रूपांतर मोठ्या भूकंपातही ठरू शकतात असा अनुमानही फारसा बांधता येणार नाही. भूगर्भातल्या हालचाली ह्या कधी, केव्हाही, कुठेही अन कशाही घडू शकतात.

बोटा परिसरात काल सायंकाळी पाच वाजून 27 मिनिटांनी झालेला भूकंप 2.4 रिस्टेल स्केल अति सौम्य अशी नोंद नाशिक मेरी येथील केंद्रावर नोंद झाली असून 90 किलोमीटरच्या अंतरावर 2.4 रिस्टेल स्केल भूकंप झाल्याची नोंद आढळून आल्याचे नाशिक मेरी येथील वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी सांगितले.

भंडारदरा डिंभे येथील यंत्र बंद
भूकंपमाप यंत्र भंडारदरा डिंभे येथे असूनही ते बंद आणि दुरावस्थेत पडल्याचे तसेच ते कार्यान्वितही नाही. सदरचे भूमापन यंत्र कार्यान्वित असते तर काल झालेल्या बोटा परिसरातील भूकंपाच्या नोंदी या भूमापन यंत्रावर झाल्या असत्या परंतु भंडारदरा डिंभे या ठिकाणचे दोन्ही यंत्र बंद असल्याचे समजते.
महाराष्ट्रात तब्बल 28 यंत्र खरेदी केल्या जाणार असल्याचे बोलले जात असून याबाबत निधीही उपलब्ध असल्याचे समजते.
राज्य धरण सुरक्षितता संघटनेचे अधीक्षक अभियंता निलेश दुसाने म्हणाले की, त्वरीत यंत्र बसवण्याची गरज असून बोटात झालेला भूकंप या अनुषंगाने आपण वरिष्ठ आणि संबंधित विभागाशी माहिती घेऊन बोका परिसरातील घटनेची माहिती देण्यात येईल. ते म्हणाले की, जलसंपदा विभाग कार्यकक्षेत भूकंपमापन यंत्र येत नाही. धरणाची धरण सुरक्षा कायद्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कोयना आणि मध्यवैतरणा या दोन धरणावर भूकंप मापन यंत्र बसवणे गरजेचे आहे. आणि उर्वरित धरणावर त्याचा रोड मॅप शासनाला सादर केला असून त्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे दुसाने म्हणाले. याबाबत ते म्हणाले की भूकंपा बाबतची सर्व माहिती "अर्थ ऑफ सायन्स" या वेबसाईटवर उपलब्ध केल्या जाते. तसेच "भूकंप" नावाचा ॲप असून ज्या ज्या ठिकाणी भूकंप झाला त्याची अद्यावत माहिती या ॲपवर उपलब्ध होत असते. आपल्या येथे भूकंपमापन यंत्र नसल्याचे दुसाने यांनी सांगितले. निलेश दुसाने म्हणाले की त्वरित भूकंप मापन यंत्र बसविण्याची गरज नसून त्वरण मापन accelerograph यंत्रे बसवायची आहे
डॅम सेफ्टी अॅक्ट नुसार सिस्मोग्राफ एस्ट्रोग्राफ हे दोन्हीही बसविणे गरजेचे आहे परंतु याबाबत धरण सुरक्षा जलसंपदा तसेच भूकंपाच्या दृष्टिकोनातून याबाबत एकूणच उदाशिवता दिसून येत आहे. धरण सुरक्षा तसेच परिसरातील भूकंपाच्या सातत्याने भूगर्भात होणाऱ्या हालचालीवर नियंत्रण करण्यासाठी या यंत्राचे नितांत गरज असल्याचे बोलले जात असले तरी जलसंपदा विभाग तसेच भूकंप आणि धरण सुरक्षा यामध्ये तिढा तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होतो. धरण क्षेत्रात तसेच डॅम वर भूकंप मापन यंत्रा बाबत एकूणच उदासीनता असल्याचे कालच्या घटनेतून स्पष्ट होते. कोट्यवधी रूपयाचा निधी उपलब्ध असूनही भूकंप मापन यंत्र का बसवल्या जात नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.
डॅम सेफ्टी आणि जनतेसाठी हे करावेच लागणार !
अॅक्सेलेरोग्राफ नावाचे उपकरण जमीनीतील हलचालीचे मोजमाप करण्याचे काम करते आणि रेकॉर्ड करते. भूकंपाच्या वेळी जमिनीची हालचाल रेकॉर्ड करण्यासाठी, शास्त्रज्ञांना भूकंपीय हलचाली समजून घेण्यास मदत होते. अॅक्सेलेरोग्राफ यावर मौल्यवान डेटा प्रदान करू शकतात: कंपनाचे नमुने, धक्के ,प्रतिरोधक,भूकंपीय घडामोडी याबाबतही माहिती अॅक्सेलेरोग्राफ उपलब्ध होते. या कारणास्तव डॅम सेफ्टी अॅक्ट नुसार सिस्मोग्राफ एस्ट्रोग्राफ हे दोन्हीही बसविणे गरजेचे आहे.
