ब्रेकिंग न्यूज :
भारत

शिवसेनेचा स्फोट ; आमच ठरल;

Blog Image
एकूण दृश्ये: 161

शिवसेनेचा स्फोट ;आमच ठरल; संगमनेर श्रीरामपुरात नगरसेवकासाठी जास्त जागांसाठी आग्रही; कोपरगाव शिर्डी राहाता नेवासा नगराध्यक्ष काँग्रेसचाच ; उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नारा ; कुठे नगराध्यक्ष तर कुठे नगरसेवक रिंगणात; भगवा फडकवण्याची रणधुमाळी

    संगमनेर, { भारत रेघाटे }

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या रणशिंगाने राजकीय तापमान चांगलेच तापत चालले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नारा देत जणू रणघोष करत नगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. जिल्हाप्रमुख सचिन कोते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीत संघटनात्मक चर्चासह आता थेट राजकीय पत्ते उघडण्यात येत आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी स्वतंत्र निवडणूक समितीही स्थापन करण्यात आली असल्याचे कोते म्हणाले.

 

नगरपरिषदेच्या रणांगणात उद्धव ठाकरेंची शिवसेना आघाडी भगवा फडकवणाच असे सांगत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने संगमनेरमध्ये स्वबळावर लढण्याचा इरादा जाहीर केला असला, तरी जिल्ह्यातील इतर नगर पालिकांमध्ये समीकरणे वेगळी दिसत आहेत. कोपरगाव, राहाता, शिर्डी आणि नेवासा येथे मशाल चिन्हावर काँग्रेस उमेदवारास जागा देण्याचा निर्णय असून या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्ष या पदावर लढत देणार आहे, तर संगमनेर व श्रीरामपूर मध्ये मात्र आघाडी तत्त्वावर आणि पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय सर्वसंमत राहणार आहे. संगमनेर श्रीरामपूर मध्ये काही जागा नगरसेवकाच्या पदासाठी आग्रही राहणार असल्याचे कोते म्हणाले. गेल्या काही महिन्यात शहर व तालुका पातळीवर झालेल्या बैठकींमधून पक्षाने संघटन शक्ती वाढवली आहे. या बैठकीने शिवसैनिकांना पुन्हा जोम मिळाला असून, संगमनेरच्या आकाशात भगवा झेंडा फडकेल अशी ग्वाही देत कोते यांनी थेट आव्हान दिले असल्याने स्थानिक नेत्यांना नवी ऊर्जा तर विरोधकांना ताण अशी काहीशी परिस्थिती दिसून येते. या बैठकीला ऍड. दिलीप साळगट, भाऊसाहेब हासे, संजय फड, अमर कतारी, अमित चव्हाण, रवींद्र कानकाटे, वैभव अभंग, असिफ तांबोळी, आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली.

    चौकट 

संगमनेर हे परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असले तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने येथे थेट लढाई लढण्याची घोषणा करून विरोधकांच्या तंबूत खळबळ माजवली आहे. आघाडीचा सन्मान राखत नगरसेवकाच्या जागा लढणे ही राजकीय कसरत किती यशस्वी ठरेल, हा येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी संगमनेरच्या गल्लीबोळांत एकच चर्चा रंगताना दिसत आहे. येत्या काही दिवसात प्रचाराची रणभूमी सजणार असून आता कोणत्या उमेदवाराला पक्षाचे निशाण मिळणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले.

----- Advertisements -----

श्रम हेच यशाचे खरे साधन आहे.

लोकमान्य टिळक