शिवसेना उध्दव गटाचे माजी शहराध्यक्ष अमर कतारींची फसवणूक ; पोलीस कर्मचारी महालेंनी लाच घेतल्याचा आरोप, कार्यवाहीची मागणी ; पोलीस अधीक्षक, लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल
संगमनेर : प्रतिनिधी
जमीन व्यवहारात आर्थिक फसवणूक झाल्याने, एका शहर प्रमुखाने शहर पोलिसात तक्रार दखल केली. परंतु कार्यवाहीसाठी विलंब होत गेल्याने मदत मागण्यासाठी गेले असता एका पोलीस कर्मचाऱ्यांने लाच घेतल्याचा आरोप शिवसेना उद्धव गटाचे माजी शहराध्यक्ष अमर कतारी यांनी केला आहे. याबाबत अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, तसेच लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजीत त्रिपुटे यांच्याकडे तक्रार दाखल केल्याने राजकीय वर्तुळासह पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घडलेली हकीकत अशी आहे की, जागा खरेदी विक्रीच्या माध्यमातून मोठ्या रक्कमेची फसवणूक झाल्याने संगमनेर तालुका पोलीस नाईक धनंजय सुभाष महाले या भ्रष्ट, कर्तव्यशून्य पोलीस कर्मचाऱ्यांने लाच घेतल्याचे माजी शहराध्यक्ष अमर कतारी यांचे म्हणणे असून महाले यांची तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी माजी शहर प्रमुख ए. के. कतारी यांनी केली आहे.
दिलेल्या तक्रारीत कतारी म्हणतात की, 19/01/2023 रोजी नाथा केशु जाधव यांनी जागा खरेदी विक्रीच्या माध्यमातून मोठ्या रक्कमेची माझी फसवणूक केली. यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढूनही मला न्याय मिळाला नाही. उलटदर्शी पोलीस कर्मचारी धनंजय सुभाष महाले यांनी या कामापोटी चाळीस हजार रुपये द्या तुमचे काम करून देतो असे दिलेल्या तक्रारीत कतारी यांनी नमूद केले आहे. दरम्यान याप्रकरणी मदत करण्याचे आश्वासन देत महाले पोलीस कर्मचाऱ्याने तीस हजार रुपये लाच घेतल्याचा आरोप शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी केला आहे. दरम्यान पोलीस धनंजय महाले यांनी नेहरू गार्डन येथे एका कार मध्ये बोलवून आपले ठरलेले खर्चा पैकी 40 हजार रुपये मला द्या. फिर्यादी प्रमाणे संबंधित आरोपी विरोधात कारवाई होणे अपेक्षित असल्याने मी धनंजय महाले यांना 20 हजार रुपये त्यांच्या कारमध्ये रोख स्वरूपात अदा केले. आरोपी विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई केल्यानंतर मी उर्वरित रक्कम तुम्हास देतो. त्यानंतर महाले तिथून निघून गेले.
यानंतर वेळोवेळी मी धनंजय महाले यांना प्रत्यक्ष भेटून कारवाई होणे बाबत वेळोवेळी विनंती करून कोणतीच कारवाई केली नाही. उलट कागदपत्रे खर्चाच्या नावाखाली माझ्या कडून 20/04/2023 ते 6 /6/ 2025 दरम्यान 10,,000 रुपये लाच म्हणून माझ्या कडून उकळली असून शासकीय कर्तव्य पार पाडताना कर्तव्यात कसूर केली. पोलीस महाले यांनी लाच घेतल्याचा दावा अमर कतारी ने केला आहे. दरम्यानच्या काळात मोबाईल वरून झालेल्या संभाषणाचे संदर्भ, स्क्रीन शॉट, आणि व्यवहाराच्या संबंधी काही कागदपत्रे जोडले असल्याचे ते म्हणाले. 8/1/2024 ते 23/ 6/ 2025 पर्यंतचे व्हाट्सअप चॅटिंग, स्क्रीन शॉट, प्रिंट आऊट सोबत जोडले आहे. पोलीस अधीक्षक घार्गे, लाच लुचपत विभागाचे त्रिपुटे यांच्या कडे शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष कतारी यांनी तक्रार दाखल केल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ असून पोलीस प्रशासन काय कार्रवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
