ब्रेकिंग न्यूज :
भारत

शेतातले पाणी ओसरले ; मदतीविना अधिकारी मदत देण्याचे विसरले:

Blog Image
एकूण दृश्ये: 119

शेतातले पाणी ओसरले ; मदतीविना अधिकारी मदत देण्याचे विसरले:  मदत न मिळाल्यास नागरिक ग्रामस्थ धरणावर धरणार धरणे

     बुलडाणा { भारत रेघाटे }

बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या देऊळगाव कुंडपाळ येथील सिंचन प्रकल्पाला भगदाड पडल्याने हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने सोयाबीन तूर कापूस या पिकाचे अतिशय नुकसान झाले असून परिसरातील तब्बल १५ ते २० गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अधिकाऱ्यांनी या पाण्याची पाहणी केली खरी. मात्र आठवडा उलटूनही शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला असून मदत न मिळाल्यास ग्रामस्थ शेतकऱ्यांनी धरणावर धरणे धरण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत  आहे. तसेच पालकमंत्र्यांनी या भागाचा दौरा करून पाहणी करत शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी असा जोर धरल्याचे नागरिकांमधून दिसून येत आहे.आहे.

       देऊळगाव कुंडपाळ लघु पाटबंधारे सिंचन प्रकल्प २१ जुलै च्या मध्यरात्री झालेल्या ढग फुटी सदृश्य पावसामुळे शंभर टक्के भरून ओसंडून वाहू लागला होता. या पावसामुळे प्रकल्प बांधाच्या मध्यभागी पाण्याच्या दबावाने भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने परिसरातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसानही झाले होते. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला होता. तद्वतच या ठिकाणची पाटबंधारे विभागाचे अधिकारी, लोणारचे तहसीलदार भूषण पाटील तसेच शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदू भाऊ मापारी तलाठी जगन बारबुते ग्रामसेवक लक्ष्मण जायभाये देऊळगावचे सरपंच शेषराव डोंगरे त्याचबरोबर गावचे ग्रामपंचायत सदस्य विष्णू सरकटे, सुनील नरवाडे, अमोल सरकटे, ज्ञानेश्वर गाढवे यांनी पाहणी करून नागरिकांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. परंतु ही नित्याचीच बाब असल्याने व धरणाच्या भिंतीवर मोठ मोठे झाडांनी पूर्ण भिंत झाकल्याने बांध कधीही फुटू शकतो अशी भीती ग्रामस्थांमध्ये आजही असून ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली होती. आता या परिसरातील पाणी चांगलेच ओसरले असून अधिकाऱ्यांनी पाण्याची पाहणी करत नंतर अधिकारी इतस्ततः पसरल्याने प्रशासन स्तरावर दुर्लक्ष झाले की काय असा प्रश्न नागरिक आता करू लागले. शासनाने तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. येत्या काही दिवसात शासनाची मदत न मिळण्यास धरणावरच धरणे धरण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. 

    यांनी केली मदत 

सामाजिक कार्यकर्ते ह भ प तुळशीराम महाराज सरकटे ज्ञानेश्वर सरकटे यांनी आपल्या माऊली मंगल कार्यालयात शेतकरी बांधवांची व्यवस्था केली होती. तसेच सामाजिक कार्यकर्ते भारत राठोड यांनी आपल्या तुळजाई रेस्टॉरंट वर काही शेतकरी बांधवांची व्यवस्था केली. माऊली नगरातील रहिवाशांनी आपल्या घरी राहण्याची तसेच भोजन व्यवस्था केली होती. माऊली वॉटर सप्लाय चे मालक गजानन प्रल्हाद सरकटे यांनी पाण्याची व्यवस्था केली.

----- Advertisements -----

   या गावाचे झाले नुकसान 

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सरस्वती, कोयाळी, पिंपरकणे, देऊळगाव कुंडपाळ, अंभोरा, चिंचोली सांगळे, येवती, पारांडा, दराडे धायफळ , किनी आदि गावातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये सरस्वती 417.29 हेक्टर कोयाळी 545 हेक्टर पिंपरखेड 419 33 हेक्टर देऊळगाव कुंडपाळ 998.62 हेक्टर अंभोरा 625.14 चिंचोली सांगळे 726 येवती 862 पारडा दराडे ५७१ धायफळ ५६४.४७ किनी 512 अशा तब्बल जवळपास 20 गावांचे हजारो हेक्टरच्या घरात शेत जमान मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते.

स्वप्न पाहा आणि ते साकार करण्यासाठी मेहनत करा.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम