ब्रेकिंग न्यूज :
भारत

शांतता कमिटीत तू तू में में चा वाजला डीजे ; माजी नगराध्यक्षा सह एकावर गुन्हा दाखल

Blog Image
एकूण दृश्ये: 169

शांतता कमिटीत तू तू में में चा वाजला डीजे ; माजी नगराध्यक्षा सह एकावर गुन्हा दाखल      

    संगमनेर 

शांत आणि सुसंस्कृत असलेल्या संगमनेर शहरात आता धार्मिक उत्सवाच्या शांतता बैठकीतही राजकीय रंग चढल्याने शहरातील धार्मिक वातावरणातही राजकीय वातावरण तापण्याचे चिन्ह दिसू लागली आहेत. शांतता कमिटीत काही जणांनी केलेल्या तू तू में में चा डीजे वाजल्याने सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या संगमनेर मध्ये धार्मिक कार्यक्रमातही एकमत होऊ शकत नाही. एवढे होऊनही पोलिसांची भूमिका मात्र संयमी असल्याने नेमके शांतता कमिटीची बैठकच अशांततेमुळे भंगली असून उत्सव सुरू होण्यापूर्वीच गालबोट लागण्यास आरंभ झाला हे तितकेच खरे. 

 या उत्सवातील राजकारण कोणत्या थराला जाईल हे सांगणे आता संगमनेरकरांसाठी नवखे राहिलेले नाही. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, प्रांत अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, शहर पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, नायब तहसीलदार सुभाष कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता शाम मिसाळ, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार यांच्यासह गणेश उत्सव मित्र मंडळाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीला बाचाबाचीच्या खडाजंगीने जणू काय आखाड्याचे स्वरूप आले होते. अखेर तू तू में में करत या शांतता बैठकीत आवाजाचा डीजे वाजल्याने पोलीस प्रशासनाने संयम दाखवत संगमनेकर आणि पदाधिकाऱ्यांना दोघांनाही समजावून सांगा शांततेची भूमिका स्वीकारा अशी विनंती केली. सार्वजनिक उत्सवाच्या शांतता बैठकीचा भंग केल्याप्रकरणी वादाला तोंड फुटले. ज्या उत्सवासाठी शहरात शांतता राहण्यासाठी बैठक आयोजित केले जाते, ती बैठकच अशांततेच्या मार्गाने गेल्याने शहर पोलिसात माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक सह त्यांचा पुतणे वैष्णव मुर्तडक यांच्या विरोधात. शुक्रवार दिनांक 22 सायंकाळी शांतता कमिटीच्या बैठकीत घडलेल्या प्रकारामुळे शहर पोलीसांनी भारतीय न्याय संहिता कलम 112 ,117 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. संगमनेरची बाजारपेठ मोठी आहे. एकूणच एक महिन्यापासून हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार सणासुदीस सुरुवात झालेली आहे. नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन आणि कालचा बैलपोळा हा सण साजरा झाला खरा. परंतु येत्या दोन दिवसात श्रीगणेश उत्सवात संगमनेर फेस्टिवलची सुरुवात होत असून या राजकीय कुरघोडीच्या वादंगाचा फटका बाजारपेठेला बसतो की काय ? असे आता वाटू लागले आहे. कारण शांतता कमिटीच राजकीय वास येत असल्याने द्वेष उफाळून आल्याचे स्पष्ट होत आहे.

----- Advertisements -----

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद