शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा; गावात निषेध सभा,रास्ता रोको, कारवाई न झाल्यास मोर्चा काढणार
संगमनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील मीरपूर -लोहारे येथील शेतकरी अनिल गणपत आहेर, राजू छबू साळवे यांच्या वर गावातीलच दीपक पोकळे या सराईत गुन्हेगाराने धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला त्याच्या साथीदारासह तो फरार झाला आहे. ही घटना घडून आठवडा उलटून गेला तरी पोलिसांनी त्यांना पकडले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मीरपूर लोहारे येथे मोर्चा काढत संताप व्यक्त केला. दोन दिवसात दीपक पोकळेसह त्याच्या अन्य साथीदारास अटक न केल्यास समस्त ग्रामस्थ आणि वंजारी समाज एकत्र येवून भव्य मोर्चा काढू असा इशाराच मिरपूर- लोहार येथील निषेध सभेत देण्यात आला. सभेनंतर रास्ता रोकोही करण्यात आला.

संगमनेर तालुक्यातील मिरपूर लोहारे येथील शेतकरी अनिल गणपत आहेर,राजू छबू साळवे यांच्यावर गावात दुध घालुन दुचाकीवरून घरी जात होते. त्याचवेळी गावातील पोलीस रेकार्डवर सराईत गुन्हेगार असलेल्ल्या दीपक पोकळे तेथे आला आणि त्याने धारदार शस्त्राने आहेर यांच्या वर प्राणघातक हल्ला केला. या दोघांच्या डोक्याला आणि डोळ्यास गंभीररित्या जखमी करून फरार झाले आहे . जखमी अवस्थेत आहेर यांना तातडीने संगमनेर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले.
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसात अनिल आहेर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेतील मुख्य गुन्हेगार दीपक पोकळे हा फरार होऊन सात दिवस उलटून गेले तरी अद्याप पोलीस त्यास पकडू शकले नाही. त्यामुळे मीरपूर लोहारे तसेच परिसरातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. दोन दिवसात दीपक पोकळे. आणि साथीदारांना अटक केली नाही तर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन संगमने मध्ये रास्ता रोको आंदोलन करतील पुढे होणाऱ्या परिणामास पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा गर्भित इशारा नाशिक राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष सुरेश आव्हाड, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, सूर्यभान गोरे, शांताराम कर्पे, शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवींद्र कानकाटे यांनी दिला आहे.

महिलांचा संताप अनावर
दोनशे लोकांच्या जमावाला न जुमानणारा गुंड याला तात्काळ ताब्यात घ्या घरात घुसून महिलांवर अत्याचार करू अशा धमक्या तो देत असल्याच्या संतापजन्य भावना मीनाक्षी आहेर, रंजना भारस्कर, ज्योती आहेर आदींनी महिलांनी व्यक्त करत सदर गुन्हेगारांना तात्काळ कठोर शासन झाले पाहिजे या मागणीसाठी मीरपूर - लोहारे येथील महिलांनी एकजूट दाखवत आपला राग अनावर केला. आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा सज्जड इशाराच देत यावेळी रास्तारोको करण्यात आला. पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार घोषणाबाजी करत मागणी करण्यात आली आहे.

गुन्हेगारांना अटक करणारच : सोलोमन सातपुते
यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत गावातील आवजीनाथ मंदिरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्या शेतकऱ्यावर हल्ला झाला ज्यांच्या डोक्याला ,डोळ्याला गंभीर दुखापत झाली अखेर त्यांनीच पोलीस प्रशासनास धारेवर धरत निवेदन देत तडीपार करण्याची मागणी केली आहे.
सराईत गुन्हेगार दीपक पोकळे याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात 'मोक्का'सह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून विविध पोलीस ठाण्यात खून, खुनी हल्ले, दरोडे, खंडणी, मारहाण करून लूटमार, अपहरण अशा प्रकारच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. एका अपहरणाच्या गुन्ह्यात तर दीपक पोकळे या गुंडावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून, या गुन्ह्यात सध्या तो जामिनावर बाहेर आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्याचा जामीन रद्द करून तात्काळ अटक करावी, अन्यथा आणखी गंभीर गुन्हे घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सदर गुन्हेरांचा पोलीस शोध घेत आहे. त्यांच्याविषयी कोणाला काही माहिती मिळाल्यास पोलीस प्रशासनास अवगत करावे असे आवाहन संगमनेर तालुका पोलीस उपनिरीक्षक सोलोमन सातपुते यांनी केले. तसेच त्यास लवकरच अटक करू असे आश्वासन त्यांनी दिले.
