शांत सुकेवाडीला गांज्याचे ग्रहण ; तर दोन दिवसात दोन ठिकाणी धाड अंमली पदार्थविरोधी संयुक्त पहिल्या कारवाईत १ करोड १४ लाख ४ हजार ८०० किंमतीचा गांजा दोन टेम्पो जप्त; बाप ताब्यात, मुलगा फरार दुस-या कार्यवाहीत चौघे अटक एवढा पकडला गा़ंजा.
संगमनेर ( प्रतिनिधी )
अंमली पदार्थ विरोधी पथक, नाशिक विभाग आणि संगमनेर शहर पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या धडक कारवाईत १ कोटी १४ लाख ४ हजार ८०० रुपये किमतीचा गांजा एका घरातून जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली तर दुसरा आरोपी फरार झाला असून पुढील तपासासाठी पथक रवाना करण्यात आली आहेत.
गुरूवार दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी पोलिस उपअधीक्षक श्री. गुलाबराव पाटील यांना एका गुप्तचराकडून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. सुकेवाडी गावातील तुषार उत्तम पडवळ (वय ५५, रा. सुकेवाडी संगमनेर) हा स्वतःच्या घरात मोठ्या प्रमाणात गांजा बाळगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तातडीने छापा टाकला.
छाप्यात ४५६ किलो १९२ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला. तसेच आरोपीकडील टेम्पो क्रमांक (MH 17 D 1222) वाहनसुद्धा ताब्यात घेण्यात आली. एकूण जप्त केलेल्या गाजासह मालाची किंमत १,कोटी १५ लाख ४ हजार ८०० इतकी आहे.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसात गुन्हा क्रमांक 1082/2025 अंतर्गत भादंवि १८८, २७ (b) (ii), २७ (e) आणि अंमली पदार्थ अधिनियम ८/२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत नाशिक एएनटी पथक, नाशिक विभाग, संगमनेर पोलिस तसेच स्थानिक यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरख इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दुसरी कारवाई
गोल्डन सिटीमध्ये अवैध गांजा साठा उघड; तब्बल 8.21 लाखांचा मुद्देमाल जप्त ; शहरातील गोल्डन सिटी परिसरात पोलीस पथकाने घेतलेल्या धडक कारवाईत तब्बल 8 लाख 21 हजार 125 रुपयांचा गांजा आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरूवार दिनांक 11 रोजी रात्री पावणे दोन ते साडेचार या वेळेत करण्यात आली.
सुकेवाडीत 1 करोड 24 लाख रुपयाच्या पकडलेल्या गांजाच्या कारवाईचा शोध घेत असताना पोलीस पथकाला गोल्डन सिटीतील केशव तीर्थ, गाळा क्रमांक 2 येथे मोठ्या प्रमाणात संशयास्पद हालचाल दिसून आली. तत्काळ छापा टाकत पथकाने या ठिकाणी असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेत तपास केला असता मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. या कार्यवाहीत शुभम चंद्रकांत जाधव (28), इंदिरानगर, गल्ली क्र. 1 विशाल अशोक गायकवाड (22), जनता नगर, गल्ली क्र. 1,प्रथमेश अशोक पावडे (22), इंदिरानगर, गल्ली क्र. 4 परवेज दाऊद शेख (26), साई श्रद्धा चौक, गल्ली क्र. 1
वरील चारही जणांविरुद्ध आमली पदार्थ प्रतिबंधक अधिनियम 1985 मधील कलम 8 सह 22(ब), 20(ब) नुसार गुन्हा दाखल केला असून यामध्ये 22 किलो 94 ग्रॅम गांजा किंमत 5,73,500 रुपये 9 किलो 905 ग्रॅम गांजा आणि 2,47,625 रुपये एकूण जप्त मुद्देमाल 8,21,125 रुपयाचा माल जप्त केला. कारवाईच्या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करीत आहेत. संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात गांजाचे मोठे रॅकेट असल्याचे बोलले जात असून गांजा तस्कर पोलिसांच्या रडावर असल्याने कारवाईबाबत आता पोलीस अधिकाऱ्यांनी चांगलीच कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

